मुंबईचा धोका टळला; आता विदर्भात अतिवृष्टीचा इशारा

मुंबईचा धोका टळला; आता विदर्भात अतिवृष्टीचा इशारा

प्रातिनिधिक फोटो

काल मुंबईसह, ठाणे, पालघर, कोकण परिसरातील काही ठिकाणी अतिवृष्टीसारखी स्थिती होती. त्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविताना ‘हाय अलर्ट’ किंवा ‘रेड अलर्ट’ ची स्थिती सांगितली होती. मात्र आज अतिवृष्टीचा धोका टळला असला तरी पुढील ४८ तास म्हणचेच आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असून हे दोन्ही दिवस हवामानाखात्याने ‘सतर्कते’चे सांगितले आहे. त्यामुळे दोन्ही दिवस मुंबईकरांना काळजी घ्यावी लागणार आहे.

हवामान खात्याने आज सकाळी वर्तविलेल्या अंदाजानुसार मॉन्सून आता राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या काही भागात सक्रीय झाला आहे. याशिवाय उत्तर प्रदेश, उत्तराखंडचा काही भाग, हिमाचल प्रदेशचा काही भाग आणि जम्मू व कश्मिरचा काही भाग लवकरच मॉन्सूनने व्यापला जाणार आहे.

या स्थितीत पश्चिम मध्यप्रदेश आणि विदर्भातील काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर कोकण, मुंबईची किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या सर्व काळात समुद्र खवळलेला असणार आहे. त्यामुळे समुद्राजवळ जाताना सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे. आज दुपारी मोठ्या भरतीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

विदर्भातील या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता

नागपूर  वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भातील चंद्रपूर, अमरावती, वाशिम, अकोला या जि्ल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी आज अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

First Published on: July 3, 2019 8:37 AM
Exit mobile version