महाराष्ट्रातून डिझेल खरेदी न करण्याचा ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेसचा मोठा निर्णय

महाराष्ट्रातून डिझेल खरेदी न करण्याचा ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेसचा मोठा निर्णय

राज्य सरकारने इंधनावरील व्हॅट कपात न केल्यामुळे वाहतुकदार संघटनांनी मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातून डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने घेतला आहे. महाराष्ट्राऐवजी तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि तेलंगाणातून डिझेल खरेदी करण्याचा निर्णय वाहतुकदार संघटनांनी घेतला आहे. ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या संबंधीत ९५ लाख वाहने आहेत.

वाहतूक संघटनेने यासंदर्भात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी इशारा सुद्धा दिला होता. जर महाराष्ट्रातील व्हॅट कपात नाही झाला. तर आम्ही त्याची अधिकृत विक्री बंद करू. तसेच महाराष्ट्रामध्ये स्टॉक येण्यापूर्वीच आमच्याकडे ठेवू. अशी आक्रमक भूमिका वाहतूकदार संघटनेकडून घेण्यात आलेली आहे.

महाराष्ट्रातील व्हॅट कमी न झाल्यामुळे डिझेल खरेदी बंद करण्यात आली आहे. या संघटनेची साधारणत: ९५ लाख इतकी वाहने आहेत. त्यामुळे प्रामख्याने दक्षिण भारतातून उत्तर भारताकडे जी वाहने जातात तेथील डिझेलची किंमत खूप कमी आहे. त्यामध्ये कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे. त्यामुळे येथील डिझेल खरेदी करून उत्तर भारताकडे जाताना महाराष्ट्र लागतो. परंतु महाराष्ट्रातून डिझेल खरेदी करण्यात येणार नाहीये.

उत्तर दक्षिणातून हे स्टॉक घेऊन थेट उत्तर भारताकडे रवाना होतील. त्यामुळे महाराष्ट्राच्या महसूलावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच राज्यातल्या पेट्रोल पंपांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, या संघटनेची दखल राज्य सरकारकडून घेण्यात येणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा: दिल्लीत वाढत्या प्रदूषणचा कहर, श्वास घेण्यास नागरिकांना होतोय भयंकर त्रास


इंधनावरील कर कमी करण्यासाठी भाजपचं आंदोलन

राज्य सरकारने इंधनावरील कर कमी करावे, या मागणीसाठी पुण्यात भाजपने आंदोलन केलं होतं. हे आंदोलन भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात महात्मा फुले मंडई चौकात करण्यात आलं होतं. केंद्र सरकारकडून इंधनाच्या वाढत्या दरात पाच ते आठव रूपयांनी कपात केली होती. परंतु राज्य सरकारने इंधनावरील कर कमी न केल्यामुळे, भाजपने मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं. या आंदोलनातून ठाकरे सरकारवर टीका करण्यात आली होती.

First Published on: November 12, 2021 2:18 PM
Exit mobile version