OBC Reservation : ओबीसी आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक सुरू

OBC Reservation : ओबीसी आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक सुरू

खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी राष्ट्रपतींची भेट घेत मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा केल्यापासून आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. याबाबत सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेत्यांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

राज्यभरात मराठा व ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे आज पुन्हा सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आलीय. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन काही दिवसांपूर्वी अशीच बैठक झाली होती. त्यानंतर ही बैठक होत असल्यानं आरक्षणाबाबत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. बैठकीत प्रामुख्याने ओबीसींचं राजकीय आरक्षण कसं टिकवता येईल, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, नाना पटोले आदी नेते बैठकीला उपस्थित आहेत. ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यावर सर्वच पक्षांचं एकमत आहे. यापूर्वी ज्या सूचना, विविध पर्याय समोर आले, त्यावर अभ्यास केल्यानंतर सर्वानुमते निर्णयासाठी बैठक होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार ही बैठक होतेय.

First Published on: September 3, 2021 5:37 PM
Exit mobile version