आंबेडकरी, बहुजन जनता माझ्यासोबत – रामदास आठवले

आंबेडकरी, बहुजन जनता माझ्यासोबत – रामदास आठवले

एक दुसर्‍याचा द्वेष टाळावा; आंबेडकरवाद्यांनी आपसातील मतभेद जाळावा म्हणून होत आहे हा मेळावा अशी सुरुवात करीत देशभरातील आंबेडकरी बहुजन जनता माझ्या सोबत खंबीरपणे उभी आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. रिपब्लिकन पक्षासोबत जनता आहे की नाही; शिवसेना -भाजप सोबत युती केल्यानंतर रिपाइंची ताकद आहे की नाही? माझ्या सोबत कार्यकर्त्यांची फळी आहे की नाही? हे बघण्यासाठी कामगार स्टेडियमवर प्रचंड संख्येने रिपाइंच्या मेळाव्यास जमलेल्या जनसमुहाला बघा, असे आठवले म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना -भाजप यांनी एकत्र आले पाहिजे असे सांगत दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातूनच आपण निवडणूक लढविणार असल्याचा निर्धार आठवले यांनी व्यक्त केला. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मन मोठे करून त्यांच्या कोट्यातील ही जागा रिपाइंला सोडावी असे आवाहन आठवले यांनी केले.

रिपाइंचे मतदान भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षाला मिळणार आहे. त्यामुळे त्यांनी दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ रिपाइंला सोडावा, त्यासाठी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याशीही बोलणार असल्याचे आठवले म्हणाले.

First Published on: February 5, 2019 4:04 AM
Exit mobile version