नाशिक महापालिका निवडणुकीची जबाबदारी अमित ठाकरेंकडे?

नाशिक महापालिका निवडणुकीची जबाबदारी अमित ठाकरेंकडे?

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तरुण कार्यकर्त्यांशी संवाद साधतानाच स्थानिक पातळीवर पक्षसंघटन मजबूत करण्यादृष्टीने अमित ठाकरे स्वतः लक्ष घालत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज ठाकरेंनी घेतलेला पवित्रा पाहता मनविसेचे प्रदेशाध्यक्षपद अमित यांच्याकडे दिले जाण्याची शक्यता आहे.

शहराच्या दौऱ्यावर असलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह अमित ठाकरेदेखील नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांचे प्रेम पाहून आपण भारावून गेल्याची प्रतिक्रिया अमित ठाकरेंनी व्यक्त केली. तसेच, राज ठाकरे जी जबाबदारी देतील ती घ्यायला तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. अद्याप मनविसेच्या अध्यक्षपदाबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

कुणी मनसेबाहेर जाण्याने फरक नाही : संदीप देशपांडे

मनविसे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी मनसेला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. या संदर्भात बोलताना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी कुणाच्याही येण्याजाण्याने मनसेला काहीही फरक पडत नसल्याचे सांगितले. मनसे केवळ राज ठाकरेंच्या नावावर चालते. जे गेले त्यांना शुभेच्छा. भाजपसोबत युतीचा निर्णय राज ठाकरेच घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

First Published on: July 17, 2021 2:51 PM
Exit mobile version