आरोग्य विज्ञान परीक्षा ऑनलाईन घेणे शक्य नाही, अमित देशमुख यांचे बाळा नांदगावकर यांना प्रत्युत्तर

आरोग्य विज्ञान परीक्षा ऑनलाईन घेणे शक्य नाही, अमित देशमुख यांचे बाळा नांदगावकर यांना प्रत्युत्तर

आरोग्य विज्ञान परीक्षा ऑनलाईन घेणे शक्य नाही, अमित देशमुख यांचे बाळा नांदगावकर यांना प्रत्युत्तर

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात किंवा शक्य नसल्यास स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे. या परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना मोठ्या धोक्याला समोरे जावे लागेल यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन किंवा स्थगित करावी अशी मागणी करण्यात आली होती. यावर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याबाबत केंद्रीय कौन्सिल ने परवानगी दिलेली नाही.तसेच विद्यापीठाच्या परीक्षा धोरणाशी हे सुसंगत नाही अशी प्रतिक्रिया वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असताना विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरला आहे. कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन घेण्यात यावी अन्यथा स्थगित करावी अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली होती. यावर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

वेद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलेल्या मागणीवर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याबाबत केंद्रीय कौन्सिल ने परवानगी दिलेली नाही.तसेच विद्यापीठाच्या परीक्षा धोरणाशी हे सुसंगत नाही. उच्च न्यायालय मुंबई यांनी यापूर्वीच या संदर्भातील याचिका फेटाळली आहे. यामुळे ऑफलाईन परीक्षा घेणे अनिवार्य आहे. परीक्षा कालावधीत सर्व विद्यार्थ्यांच्या कोवीड सुरक्षेची काळजी घेण्याची ग्वाही विद्यापीठ देत आहे. आशा आशयाचे ट्विट वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांची मागणी

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विट करत राज्य सरकारला विज्ञान विभागाची परीक्षा पुढे ढकलावी अन्यथा काही काळासाठी स्थगित करावी अशी मागणी केली आहे. “राज्य सरकारने १० जून पासून नियोजित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान परीक्षा या आत्ता ची परिस्थिती बघता ऑनलाइन घ्याव्यात अथवा काही काळासाठी स्थगित कराव्यात. या परीक्षा आता घेतल्यास व त्यासाठी विद्यार्थी एकत्र आल्यास विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या घरच्यांना धोका संभवतो. सरकारने या परीक्षा ऑनलाइन घेतल्यास सर्वच गोष्टी निकाली लागतील व विद्यार्थ्यांचे नुकसान देखील होणार नाही. ते शक्य नसल्यास निदान त्या काही काळा पुरत्या स्थगित कराव्यात व त्या दरम्यान या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला जोर दयावा” आशा आशयाचे ट्विट मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे.

First Published on: June 6, 2021 11:20 PM
Exit mobile version