अमित ठाकरे चार दिवसीय नाशिक दौऱ्यावर; ग्रामीण भागावर विशेष लक्ष

अमित ठाकरे चार दिवसीय नाशिक दौऱ्यावर; ग्रामीण भागावर विशेष लक्ष

नाशिक : मनसे नेते अमित राज ठाकरे शनिवार (दि.६) पासून चार दिवसीय नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून अमित पक्षाची तसेच पक्षाची युवा वहिनी असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची पुनर्बांधणी करणार आहेत. या दौऱ्यात अमित यांनी ग्रामीण भागावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचं दिसत. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात पोहचण्याचा अमित यांचा प्रयत्न आहे. दरम्यान जिल्ह्याभरात एकूण ११ मेळाव्याचं आयोजन मनसेच्या वतीने करण्यात आलं आहे.

अमित ठाकरे यांची मनसेची युवा वाहिनी असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी मनविसेच्या पुनर्बांधणीसाठी महासंपर्क अभियान माध्यमातून महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. महासंपर्क अभियानाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्यात अनुक्रमे मुंबई, कोंकण विभागाचा दौरा केल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात अमित उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्याची सुरवात उद्यापासून नाशिक जिल्ह्यातून होत आहे. अमित यांचा नाशिक जिल्हा दौरा एकूण चार दिवसाचा असेल. या दौऱ्यात ग्रामीण भागावर विशेष लक्ष केंद्रीय केलं जाणार आहे. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी शनिवारी (दि.६) इगतपुरी, सिन्नर आणि नाशिक ग्रामीण विधानसभा मतदारसंघात पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी, मुलाखती यानंतर मेळावे संपन्न होती. तर दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.७) निफाड, येवला, नांदगाव, चांदवड आणि मालेगाव विधानसभा मतदारसंघ, तिसऱ्या दिवशी सोमवारी (दि.८) बागलाण, कळवण, दिंडोरी, पेठ मतदारसंघात दौरा पार पडेल. तर मंगळवार (दि. ९) रोजी नाशिक शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच यावेळी शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. अमित व्यक्तिशः विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान जिल्ह्यातील तसेच शहरातील विद्यार्थ्यांनी अमित ठाकरे यांच्याशी व्यक्तिशः संवाद साधण्यासाठी मंगळवारी (दि.९) मनसेचे मध्यवर्ती कार्यालय राजगड येथे उपस्थित रहावे असे आवाहन मनविसेच्या वतीने करण्यात आलंय.

अमित ठाकरे घेणार आदिवासी वनभोजन

अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना सोमवारी (दि.८) कळवण तालुक्यात वनभोजनाचा आस्वाद घेणार आहेत. कळवण तालुक्यातील आदिवासी बांधवांसोबत शेतात अस्सल गावरान पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेणार आहेत. ग्रामीण जीवन, तेथील समस्या हे जवळून समजून घेता याव यासाठी वनभोजन करण्याचा मानस अमित यांनी व्यक्त केल्याचं जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी सांगितले.

First Published on: August 5, 2022 9:31 PM
Exit mobile version