मुख्यमंत्र्यांबाबत ते विधान करण्यामागे वेगळा हेतू होता, अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांबाबत ते विधान करण्यामागे वेगळा हेतू होता, अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया

स्थानिक पातळीवर भांड्याला भांडे लागणारच आणि त्यातून हा वाद झाला असल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अमोल कोल्हे यांनी म्हटलं होते की, मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री आहेत कारण त्यांच्यामागे शरद पवार यांचा हात आहे. या विधानामुळे राजकीय पातळीवर मोठी चर्चा सुरु झाली होती. यावर अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांबाबत आदर मात्र ते विधान करण्यामागे वेगळा हेतू होता. माणूस ज्या भाषेत टीका करतो त्यावरुन त्याची संस्कृती कळते अशी टीकाही अमोल कोल्हे यांनी शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर केली आहे.

खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे की, जे विधान होत ते पुर्णपणे ऐकले तर ते हेच आहे की, मुख्यमंत्र्यांबाबत नक्कीच आदर आहे. पण त्यांचे नाव घेऊन स्थानिक पातळीवर जर वेगळ्या पद्धतीने आकारण मित्रपक्षांवर टीका होत असेल तर टीका करणाऱ्यांनी ही बाब लक्षात ठेवावी. त्यापुढे म्हटलं होतं की, महाराष्ट्राच्या हितासाठी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं आहे. त्याला कोणी नख लावू नये यात वेगळी चर्चा झाली आणि राज्यपातळीवर दोन प्रकारची ही चर्चा झाली. यामध्ये कुठेतरी राज्य सरकार अस्थिर आहे असे दाखवण्यासाठी चर्चा करण्यात आली. परंतु हा स्थानिक पातळीवरचा मुद्दा आहे. स्वभाविकच आहे भांड्याला भांड लागणार हे स्वाभाविक आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार चांगलं काम करत आहे. महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत आहे त्यामुळे त्या विधानाचे सरकारशी कोणताही संबंध लावण्याची गरज वाटत नाही असे वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

माणसाच्या भाषेवरुन संस्कृती कळते

स्थानिक पातळीवर शिवेसनेचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी टीका केली होती त्यावर अमोल कोल्हे यांनी भाष्य केलं आहे. माणूस ज्या भाषेत टीका करतो त्या भाषेवरुन त्याची संस्कृती कळत असते. या विषयी वैयक्तिक बाबत टीका करण्याचे स्वारस्य नाही. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी कटीबद्ध आहे. संसदेतील कामगिरी त्याच्यावर नजरर टाकली तसेच शिरुर मतदारसंघातील केंद्र सरकारच्या आखत्यारितीमधील काम लोकांना माहिती आहेत. शिरुर मतदारसंघाचं नाव वेगळ्या कुठल्याही मुद्द्यावर चर्चेसाठी आणि टीकेसाठी आणायचे नाही यामुळे त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणार नाही असे वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलं आहे.

सरकार आदर्श घडवेल

राज्य सरकारमधील समतोल बिघडलेला नाही. सगळे नेते समन्वयाने काम करत आहेत. संजय राऊत यांनीही सांगितले आहे की, महाविकास आघाडीचे सरकार सक्षम आणि भक्कम आहे. यामुळे हे सरकार भविष्यासाठी आदर्श ठरेल. अधिवेशनात राज्यपातळीवरील, देशपातळीवरील प्रश्न मांडणार आहे. तसेच शिरुर लोकसभा मतदार संघातील बैलगाडाचा प्रश्न आहे तो अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. त्यामध्ये बैल या संरक्षित प्राण्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. तो समावेश काढून घेण्यात यावा यासाठी सातत्याने प्रयत्न करत होतो. याला यश येणार होते तेवढ्यात पुन्हा मंत्रिमंडळाच्या बदलामुळे हा प्रयत्न पुन्हा सुरु करावा लागणार आहे.

First Published on: July 19, 2021 2:51 PM
Exit mobile version