सोशल मीडियावर आदित्य ठाकरेंचा फोटो वापरून क्रीडापटूला गंडा घालण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

सोशल मीडियावर आदित्य ठाकरेंचा फोटो वापरून क्रीडापटूला गंडा घालण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

मुंबई – राजकीय नेत्यांच्या फोटोचा वापर करून फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंच्या फोटोचा वापर करत वरळीतील क्रीडापटूची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. याबाबत वरळी कोळीवाड्यातील रहिवासी दिपेश जांभळे यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.

काय आहे प्रकार –

दिपेश जांभळे हे कुस्तीपटू आहेत. त्यांना 23 ऑगस्टला व्हॉट्स अॅपवर एक मेसेज आला. व्हॉट्स अॅपवर मेसेज करणाऱ्या व्यक्तीने प्रोफाइलवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो ठेवला होता. आरोपीने तक्रारदार कुस्तीपटू दिपेश जांभळे यांच्याकडे मेसेज पाठवून पैशांची मागणी केली. यावेळी त्यांनी आपल्याला एका मित्राला तातडीने 25 हजार रुपये ट्रान्सफर करायचे असून नेटबँकिंग काम करत नाही, असे म्हटले. यानंतर तातडीने 25 हजार रुपये पाठवण्याची विनंती आदित्य ठाकरे असल्याचे भासवून हॅकर्सने केली. दिपेश यांना याबाबत संशय आला. त्यांनी त्यांनी तातडीने युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांमध्ये याची तक्रार देण्यात आली. दादर पोलिसांनी या प्रकरणी कलम 511 आणि 419 नुसार, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

 भाईंदरच्या पोलीस आयुक्तांच्या फोटो आणि नावाचा वापर –

मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त सदानंद दातेंचा फोटो आणि नाव वापरुन कोणीतरी व्हॉट्सअॅप चालवत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या व्यक्तीने अनेक पोलिसांना मेसेज करुन अॅमेझॉन गिफ्ट कार्ड खरेदी करुन पाठवण्यास सांगितले. ही बाब दाते यांना समजताच त्यांनी अज्ञात सायबर गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे काय म्हणाले –

आम्हाला तक्रार मिळाली असून आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. हा आरोपी पोलीस, रेल्वे किंवा इतर कोणत्याही शासकीय विभागात काम करणाऱ्या कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्यांची फसवणूक करतो. हा सायबर गुन्हेगार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा फोटो, बनावट मोबाईल नंबर वापरुन व्हॉट्सअॅप चालवत आहेत आणि ते त्या नंबरचा वापर करुन त्या विभागातील सर्वात कनिष्ठ लोकांना अॅमेझॉन गिफ्ट कार्ड खरेदी करण्यासाठी आणि त्यांना त्वरित पाठवण्यासाठी मेसेज पाठवत आहेत, असे महाराष्ट्र सायबर सेलचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांनी सांगितले.

First Published on: August 28, 2022 3:27 PM
Exit mobile version