अज्ञात डंपर चालकाने रस्त्यावर फेकले १२ मेट्रिक टन डेब्रिज, चालकाविरोधात तक्रार दाखल

अज्ञात डंपर चालकाने रस्त्यावर फेकले १२ मेट्रिक टन डेब्रिज, चालकाविरोधात तक्रार दाखल

दादर, माहिम परिसरात भर रस्त्यावर, रस्त्यालगत रात्रीच्या अंधारात अज्ञात डंपरचालक ड्रेब्रिजने भरलेला डंपर गुपचूप खाली करून पलायन करण्याचे प्रकार वाढले आहेत. ४ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास एका डंपर चालकाने सहकारी व्यक्तीच्या सहाय्याने एल. जे. रोड, शीतला देवी मंदिर बस स्टॉप नजीक रस्त्यालगत अंदाजे १२ मेट्रिक टन इतके
डेब्रिज टाकून पलायन केल्याची घटना घडली आहे.

मात्र पालिकेच्या जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी पालिका घनकचरा विभागाच्या संबंधीत अधिकाऱ्यांमार्फत नजीकच्या माहिम पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलीस व पालिका अधिकारी त्या डंपरचालका विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस सदर डंपर चालकाचा शोध घेत असल्याचे समजते.

सदर माहिम, सोमवारी रात्रीच्या सुमारास शितलादेवी मंदिर परिसरात एक डंपर चालक लपून छपून तेथील बेस्ट बस स्टॉपसमोर १२ टन डेब्रिजने भरलेला डंपर रस्त्यालगत रिकामे केल्याची घटना नजीकच्या सीसी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेत सदर डंपरचा नंबर अस्पष्ट दिसत आहे. तर डंपर चालकाच्या सहकार्याची हालचाल सीसी कॅमेऱ्यात टिपण्यात आली आहे. पोलीस व पालिका अधिकारी या अज्ञात डंपर चालकाचा व त्याच्या सहकारी व्यक्तीचा कसून शोध घेत आहेत.


हेही वाचा : स्वामित्व योजनेअंतर्गत देशातील जवळपास ३१ हजार गावांमध्ये मालमत्ता पत्र तयार, योजना २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट


 

First Published on: April 5, 2022 10:32 PM
Exit mobile version