आंगणेवाडीची यात्रा ६ मार्चला; कोरोनामुळे यात्रा मर्यादित स्वरुपात

आंगणेवाडीची यात्रा ६ मार्चला; कोरोनामुळे यात्रा मर्यादित स्वरुपात

सिंधुदुर्गातील आंगणेवाडीतील भराडी देवीची यात्रा ६ मार्चला होणार आहे. दरवर्षी कोकणवासीयांसाठी बराडी देवीची यात्रा पर्वणी असते. कोकणातील सर्वात मोठी यात्रा असते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित स्वरुपात यात्रा पार पडणार आहे, अशी माहितती आंगणे कुटुंबीयांनी दिली. आंगणे कुटुंबीयांच्या उपस्थित यात्रा पार पडणार आहे. भाविकांच्या होणाऱ्या गैरसोय बद्दल आम्ही दिलगीर आहोत, भाविकांना नम्र विनंती आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून श्री. देवी भराडी मातेस आपलं सांगण सांगावं, आई भराडी माता आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण करेल, असं आंगणे कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

नवसाला पावणारी देवी अशी आंगणेवाडीतील या देवीची ख्याती देशा-परदेशात पसरली आहे. त्यामुळे दरवर्षी भरणार्‍या या देवीच्या दीड दिवसांच्या यात्रेला मुंबई, पुणे शहरातून मोठ्या प्रमाणात चाकरमणी कोकणात दाखल होतात. मात्र यंदा सगळीकडे सावट पसरलेले आहे.त्यामुळे यंदा हा वार्षिकोत्सव मर्यादित स्वरुपाचा होणार असून यावेळी फक्त आंगणेकुटुंबीय आंगणेवाडी यांच्या उपस्थितित पार पडेल अशी माहिती आंगणे कुटुंबीयांकडून देण्यात आलेली आहे. भाविकांच्या होणाऱ्या गैरसोयी बद्दल आंगणे कुटुंबीयांनी दिलगीरी व्यक्त केली. भाविकांना नम्र विनंती आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून श्री. देवी भराडी मातेस आपलं सांगण सांगावं, आई भराडी माता आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण करेल, असं आवाहन आंगणे कुटुंबीयांनी केलं आहे.

First Published on: December 29, 2020 10:20 AM
Exit mobile version