ST workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांसाठी परिवहन मंत्र्यांच्या दहा घोषणा

ST workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांसाठी परिवहन मंत्र्यांच्या दहा घोषणा

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने दोन पावले पुढे टाकली आहेत. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा भार राज्य सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार देतानाच, निलंबनाची कारवाई मागे घेणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज केली. ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यांच्याबाबतही सरकार सहानभूतीपूर्वक विचार करेल, असेही परब म्हणाले. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना आगामी काळात कामगिरीच्या आधारावर इन्सेटिव्ह देण्यात येईल असेही परब म्हणाले.

१) एसटी कर्मचाऱ्यांना ठोक वेतनवाढ देण्यात येणार

२) इतर वाहतूक महामंडळाप्रमाणे कामगिरीवर आधारीत इन्सेटिव्ह देण्यात येणार

३) आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सहानभूतीपूर्वक विचार होणार

४) नियमित कामावर येणाऱ्याला पगार मिळणार

५) जाचक अटींची कल्पना कर्मचाऱ्यांनी दिली आहे, अशा निरपराधांना त्रास देणार नाही

६) एसटी कामगारांनी संप मागे ताडबतोब मागे घेण्याचे आवाहन

७) एसटी कर्मचाऱ्यांनी गुरूवार कामावर हजर व्हावे

८) हजर झालेल्यांचे निलंबन रद्द केले जाईल

९) एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी ७५० कोटी रूपये राज्य सरकारच्या तिजोरीवर भार

१०) एसटी कामगारांना १० तारखेला पगार मिळणार

 

कोणाला किती पगाराची घोषणा ?

१ वर्षे १० वर्षे (५ हजारांची वाढ) (पगारवाढ रूपयांमध्ये)

आताचा पगार                      नवीन पगारवाढ

१२ हजार ०८०                       १७ हजार ३००

१० ते २० वर्षामधील कर्मचारी (४ हजारांची वाढ )

१६ हजार                              २८ हजार ८००

२० वर्षांहून अधिक सेवा (२५०० रूपये)

३७ हजार ४४०                       ४१ हजार ०४०


ST Workers Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ, १० तारखेपर्यंत होणार पगार, अनिल परबांची घोषणा

First Published on: November 24, 2021 7:04 PM
Exit mobile version