मोतश्रीचा निरोप घेऊन आलोय म्हणत अनिल परबांचा रामदास कदमांना इशारा

मोतश्रीचा निरोप घेऊन आलोय म्हणत अनिल परबांचा रामदास कदमांना इशारा

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली जोरदार सुरु झाल्या आहेत. त्यातच आता शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाला देखील जोरात सुरुवात झालेली आहे. या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत शिवसेनेचे दोन बडे नेते. एक म्हणजे शिवसेनेचे फायरब्रँड नेते म्हणून ओळख असलेले रामदास कदम आणि दुसरे म्हणजे परिवहन मंत्री ॲड. अनिल परब. दापोली नगरपरिषदेच्या निवडणुकीपूर्वी अनिल परबांनी तीन विद्यमान पदाधिकाऱ्यांना नारळ देत नव्यांची निवड केली आहे. या निर्णयामुळे रामदास कदम आणि त्यांचे पुत्र योगेश कदम यांना धक्का मानला जात आहे. याशिवाय, ॲड. अनिल परब यांनी यावेळी बोलताना मोतश्रीचा निरोप घेऊन आलोय असं सांगितलं.

रामदास कदम यांची ॲड. अनिल परब यांच्याशी संबंधित कथित ऑडियो क्लीपमुळे पक्ष नेतृत्व कदम यांच्यावर नाराज असल्याचं पुढे आलं आहे. दरम्यान, मातोश्रीच्या जवळचे बोलले जाणारे तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी दापोली नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये लक्ष घातलं आहे. दरम्यान, त्यांनी मोठा निर्णय जाहीर करत रामदास कदम यांना धक्का दिला. यासंदर्भात परब यांनी माध्यमांशी बोलताना दापोलीला पक्ष प्रमुखांचा निरोप घेऊन आलो होतो. ज्यांनी शिस्तीचा भंग केला त्यांच्यावर कारवाई केली अशी प्रतिक्रिया दिली. यावरुन पक्षाने हा रामदास कदम यांना इशारा तर दिला नाही ना? अशा चर्चा सुरु आहेत.

शिवसेनेने दापोली नगरपरिषदेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बदल केले आहेत. अनिल परबांनी तीन विद्यमान पदाधिकाऱ्यांना नारळ देत नव्यांची निवड केली. पक्ष शिस्तीचा भंग केल्याचं म्हणत उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, तालुका प्रमुख प्रदिप सुर्वे, शहर प्रमुख राजू पेटकर यांना नारळ दिला, असं ॲड. अनिल परब यांनी सांगितलं. त्यांच्या जागी उपजिल्हा प्रमुख म्हणून राजू निगुडकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख म्हणून किशोर देसाई, तालुका प्रमुख म्हणून ऋषिकेश गुजर आणि शहर प्रमुख म्हणून संदिप चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


हेही वाचा – उद्धव ठाकरेंचा रामदास कदम आणि पुत्र योगेश कदम यांना धक्का


 

First Published on: December 16, 2021 6:27 PM
Exit mobile version