वानखेडेंनी कोऱ्या कागदांवर माझ्या सह्या घेतल्या; NCB च्या आणखी एका पंचाचा गौप्यस्फोट

वानखेडेंनी कोऱ्या कागदांवर माझ्या सह्या घेतल्या; NCB च्या आणखी एका पंचाचा गौप्यस्फोट

संग्रहित छायाचित्र

एनसीबी कारवाईतील पंच प्रभाकर साईल याच्या गौप्यस्फोटामुळे क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. दरम्यान, आता आणखी एका पंचानं एनसीबीच्या कारवाईबाबत नवा गौप्यस्फोट केला आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी खारघरमधील कारवाईच्या वेळी १० ते १२ कोऱ्या कागदांवर सह्या करायला लावल्या, असा दावा एनसीबीचा पंच शेखर कांबळे याने केला.

खारघरमध्ये एनसीबीने नायजेरियन नागरिकाला ड्रग्जप्रकरणी अटक केली होती. यात शेखर कांबळे हा पंच होता. त्याने खळबळजनक गौप्यस्फोट केला. नायजेरियन नागरिकांवर झालेल्या कारवाईचं हे प्रकरण आहे. या प्रकरणात ज्या दोघांना पकडण्यात आलं होतं, त्यांच्याकडं कुठलंही ड्रग्ज सापडलेलं नव्हतं. असं असतानाही त्यांच्याकडं ६० ग्रॅम ड्रग्ज सापडल्याचं नमूद करण्यात आलं, असं शेखर कांबळे याने सांगितलं.

सगळ्या चौकशीसाठी तयार

मला काल अनिल माने यांचा रात्री फोन आला. पण मी तिथे गेलो नाही, मला आता भीती वाटत आहे. न्यायालयात केस जाईल तेव्हा न्यायाधीश जे विचारतील तेव्हा मी काय उत्तर देणार? कारण मी पंचनामा वाचलेला नाही. म्हणून मी आता समोर आलो आहे. समीर वानखेडे मला १९ तारखेपर्यंत फोन करायचे, खूप वेळा फोन करायचे. मी नायजेरीयन नागरिकांची माहिती द्यायचो. पण त्यांनी मला अंधारात ठेवलं. मी पुढील सगळ्या चौकशीसाठी तयार आहे, असंही शेखर कांबळे याने सांगितलं.

 

First Published on: October 27, 2021 6:16 PM
Exit mobile version