Aptech चे एमडी आणि सीईओ डॉ. अनिल पंत यांचे निधन

Aptech चे एमडी आणि सीईओ डॉ. अनिल पंत यांचे निधन

मुंबई : कंम्प्यूटर कंपनी अॅपटेकचे (Aptech) व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ डॉ. अनिल पंत यांचे निधन झाले आहे. अनिल पंत यांचे मंगळवारी 15 ऑगस्टला निधन झाल्याची माहिती कंपनीने दिली. डॉ. अनिल पंत यांचे योगदान आणि ऊर्जा आता कंपनीला मिळणार नाही, असे कंपनीने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. डॉ. पंत हे 19 जून महिन्यापासून सुट्टीवर गेले होते. यानंतर कंपनीने तातडीची बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी कंपनीचे कामकाज सुरळीत राहण्यासाठी निवडक सदस्य आणि वरिष्ठ व्यवस्थापन यांचा समावेश समावेशे असलेली अंतरिम समिती स्थापन केली होती.

डॉ. पंत हे 2016 पासून अॅपटेकचे एमडी आणि सीईओ होते. यापूर्वी पंत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि Sify Technologies यांसारख्या कंपन्यांशी संबंधित होते. डॉ. पंत हे 25 वर्षांहून आयटी आणि कम्युनिकेशन क्षेत्रात गुणवत्ता, विक्री, वितरण, विपणन आणि उत्पादन व्यवस्थापन यासारख्या विविभागाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. डॉ. पंत यांनी बीएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिक पदीवी (बीई), लिंकन युनिव्हर्सिटी कॉलेज आणि मलेशिया येथून माहिती तंत्रज्ञानात पीएचडी केली.

डॉ. पंत हे 2010 ते 2016 मध्ये टीसीएसचे प्रमुख सल्लागार म्हणून देखील काम पाहिले आहे. डॉ. पंत यांनी डोमेन चाचणीसाठी 100 दशलक्ष डॉलर जमा केले होते. डॉ. पंत यांचे 2008 ते 2010 पर्यंत उपाध्यक्ष म्हणून सिफी टेक्नॉलॉजीजशी संबंधित होते. त्याचबरोबर डॉ. पंत हे ब्लो पास्ट, क्रॉम्प्टन ग्रीव्हज, टॅली आण विप्रोसह अनेक कंपन्यात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत.

First Published on: August 16, 2023 4:02 PM
Exit mobile version