शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा होणार; अरविंद सावंत यांचा निर्धार

शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा होणार; अरविंद सावंत यांचा निर्धार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 41 हून अधिक आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत मोठी फूड पडली. राज्यातील सत्तांतरणानंतर यंदा शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजी पार्क मैदानात शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो. मात्र मूळ शिवसेनेवर दाव्या करणाऱ्या शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार की शिवसेनेचा यावरील निर्णय अद्याप बाकी आहे. अशात शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आमच्याकडे पर्याय नाही, शिवाजी पार्कवरच आम्ही मेळावा घेऊ, शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा होणार आहे अशा शब्दात शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

हे शिवसंकेत आहेत. शिवाजी पार्कवर पहिली गर्जना आम्ही दिली, त्यामुळे शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परंपरा आमची होती. शिवसेनेच्या निर्मितीनंतर शिवाजी पार्कवर पहिला मेळावा मूळ शिवसेनेचा झाला. यानंतर पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या. बाळासाहेब यांचे स्मृथीस्थळदेखील तिथेच आहे. त्यांनी त्याच मैदानावरून आव्हानं दिली पण आमचा मेळावा थांबला नाही आणि सोनं लुटनं सुरु राहिलं. असं अरविंद सावंत म्हणाले.

आताचं राजकरण लोकांना आवडत नाही आहे आणि हे दिसून येत आहे. हे लिहून दिलेलं स्क्रिप्टप्रमाणे वागत आहे. उद्धवजी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे चालो आहोत, त्यांनी कोणतीही अडकठी करू नये, भाजपच्या मनात हा खरा डाव आहे, उद्धव ठाकरे यांनी संयमाने हा सगळा काल सोसला. जाणीवपूर्वक भाजपने प्रसंग निर्माण केला, यात दोन आजी माजी शिवसैनिक सामोर येतील आणि ते भिडतील असं भाजपचं स्वप्न होतं. असा आरोपही अरविंद सावंत यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देशात अनेक ठिकाणी दंगे झाले, त्यांनी सगळ्यांनी सोबत घेतलं आणि ते पुढे गेले. हिंदुत्वव आम्ही कधीही सोडलं नाही. 97 ला हिंदुत्वविरोधात तुम्ही आमच्याशी लढले, तेव्हा भाजप कुठे होत? 2014 साली युती का तोडली? 2014 विधानसभेचा विश्वासदर्शक ठराव केला त्यावेळेला शरद पवार यांनी मदत केली तेव्हा कुठे गेले होते हे? सगळं आयुष्य यांनी कटकरस्थान करत आहेत.अशी जहरी टीकाही अरविंद सावंत यांनी केली आहे.

रामणा जाताना माफ करत म्हणाले. न्यायमंडळ कायदा करणार मंडळ आहे, सत्य लपवू नका. सगळ्यांना प्रश्नांना कसं भरकटवायच हे या सगळ्यांना बरोबर माहित आहे. जर कोर्टाने आमचा अर्ज फेटाळला तर आमचं शिष्टमंडळ आयुक्तांची भेट घेईल. शिवसेना टिकाऊ आहे विकाऊ लोकांचा बोलण्याचा अधिकार नाही अशा शब्दात त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

रामदास कदम कसले निष्ठावंत, दापोली खेडमध्ये त्यांना लोकांनी हरवलं

बाळासाहेब ठाकरे नक्की बघत असतील की मी कसा गद्दारांना जन्म दिला आहे. केशवराव भोसले यांना भेटा आणि मग बघा. वाटेल त्या थापा मारायच्या. किती वर्ष सत्तेवर होते ते बघा. हे पवार साहेब यांच्या सोबत फिरायचे. रामदास कदम कसले निष्ठावंत, दापोली खेडमध्ये तुम्हाला लोकांनी हरवलं. विधानसभेत शिवसेनेमुळे तुम्ही होता, यांचे क्रिमिनल रिपोर्ट काढा. ज्यावेळा देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांच्या विरोधात पुरावे काढले. किरीट बोलले आमच्याकडे आले आता सगळे साफ झाले, चारही स्तंभ हलत आहेत, आणि सत्ताधारी आता वापर करत आहेत. काय बोलत आहेत ते? हे अश्रित सारखे फिरत आहेत. ज्यांनी आश्रय दिला हे त्यांचे स्क्रिप्ट आहेत. अशा शब्दात त्यांनी रामदास कदम यांच्यावर आरोप केले आहेत. रश्मी वाहिनी देखील मैदानासमोर बसलेल्या असतात. त्यांनी मंचावर यावं अशी विनंतीही अरविंद सावंत यांनी केली आहे.


संजय राऊतांना पुन्हा जेल की बेल! जामीन अर्जावर आज सुनावणी

First Published on: September 19, 2022 2:01 PM
Exit mobile version