Aryan Khan Drugs case : किरण गोसावीला पुणे पोलिसांनी नेमक्या कोणत्या प्रकरणात केली अटक?

Aryan Khan Drugs case : किरण गोसावीला पुणे पोलिसांनी नेमक्या कोणत्या प्रकरणात केली अटक?

Aryan Khan Drugs case : किरण गोसावीला पुणे पोलिसांनी नेमक्या कोणत्या प्रकरणात केली अटक ?

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील वादग्रस्त पंच किरण गोसावीला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आर्यन खानसोबतच्या सेल्फीमुळे वादात सापडलेल्या किरण गोसावीविरोधात पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात यापूर्वीच फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र गुन्ह्याची नोंद झाल्यापासून किरण गोसावी फरार होता. नोकरीचं आमिष दाखवून अनेक तरुणांची फसवणूक केल्याचे आरोप किरण गोसावीवर आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांकडून किरण गोसावीची कसून चौकशी केली जाणार आहे. अशातच पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज पत्रकार परिषद घेत किरण गोसावी नेमक्या कोणत्या प्रकरणात अटक झाली हे स्पष्ट केले आहे.

किरण गोसावीला नेमक्या कोणत्या प्रकरणात अटक?

पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाची २०२१ मध्ये फसवणूक केल्याचे आरोप किरण गोसावीविरोधात आहे, देशमुखला मलेशियात नोकरी लावण्याच्या आमिषाने किरण गोसावी आणि शेरबानो कुराशी यांनी तब्बल तीन लाखांची फसवणूक केली होती. त्यानंतर २०१८ मध्ये तक्रारदार चिन्मय देशमुख याने पुण्यातील फरारखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. याच गुन्ह्यात काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी शेरबानो कुरेशीला मुंबईतून अटक केली. यानंतर आज पहाटे कात्रजमधून किरण गोसावीला अटक केली आहे.

पुणे पोलिसांकडून गोसावीविरोधातील गुन्ह्याचा खुलासा

पुणे पोलिसांनी आज किरण गोसावीला नेमक्या कोणत्या प्रकरणात अटक केली याची माहिती दिली आहे. यावर बोलतना पुणे पोलिसांनी सांगितले की, २०१८ मध्ये किरण गोसावीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या आरोपीविरोधात ४२० आयटी अॅटनुसार फसवणूकीचे गुन्हे दाखल होते. चिन्मय देशमुख या तरुणाला नोकरी देण्याचे आमिष दाखवून मलेशियाला पाठवत त्याची किरण गोसावीने फसवणूक केली होती. मार्च २०१९ मध्ये गोसावीविरोधात आरोप पत्र दाखल करण्यात आले. मात्र तेव्हापासून तो फरार होता. अलीकडच्या काळात त्याचे फोटोग्राफ सोशल मीडियावर पाहायला मिळाले. तेव्हापासून पुणे पोलिसांचे अनेक पथकं त्याचा मागावर होती. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास किरण गोसावीला अटक करण्यात यश आले आहे. असं पुणे पोलीस आयुक्त म्हणाले.

अटकेपासून वाचण्यासाठी गोसावी गेल्या १० दिवसांपासून लखनऊ, जबलपूर, तेलंगणा, हैदराबाद, फतेहपूर, जळगाव, मुंबई, पनवेल, लोणावळा भागात फिरत होता. दरम्यान लखनऊमध्ये असताना किरण गोसावी सचिन पाटील नावाने हॉटेलमध्ये राहत होता.

स्टॉप क्राईम ऑर्गनायजेशन एनजीओचा सदस्य तसेच शिप्का नावाच्या डेटेक्टिव्ह एन्जसीचा मेंबर असल्याचे तो सांगतो. याशिवाय त्याचा एक्सपोर्ट- इनपोर्टमध्ये त्याचा व्यवसाय आहे. यात मेटल, इलेक्ट्रोनिक्सच्या एक्सपोर्ट – इमपोर्टचं काम होते असे त्याने तपासात उघड केले. नोकरीचे आमिष दाखवून फसवल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. अशी माहितीही पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता दिली आहे.

पालघरमधील तरुणांचीही झाली फसवणूक

किरण गोसावीला के.पी.गोसावी या नावाने देखील ओळखले जाते. गोसावीने परदेशात नोकरी देण्याच्या आमिषाने पालघरमधील दोन तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. पालघर तालुक्यातील एडवण या गावातील उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे अशी या तरुणांची नावे आहेत. गोसावीने या दोघांनामलेशिया येथे कामाला लावतो असे सांगून त्यांच्याकडून दीड लाखांची मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

‘या’ कंपनीद्वारे करायचा फसवणूक

वादग्रस्त पंच किरण गोसावी के. पी. जी. ड्रीम्स रिक्रूटमेंट कंपनीचा मालक असल्याची माहिती समोर आली आहे. या कंपनीचे मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहेत. बड्या पोलिस अधिकाऱ्यांचा खासगी गुप्तहेर अशी के.पी. गोसावीची ओळख आहे. याशिवाय पोलिसांच्या पाटी वाहनांना लावून तो फिरत असल्याचेही सांगितले जातेय.

याशिवाय राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात किरण गोसावीने पैसे खाल्याचे आरोप केले आहेत. याशिवाय गोसावीचा बॉडीगार्ड आणि पंच प्रभाकर साईलनेही गोसावीवर लाचखोरीचे आरोप केले आहेत.


 

First Published on: October 28, 2021 2:18 PM
Exit mobile version