खूषखबर! आशा सेविकांच्या मोबदल्यात वाढ; राज्य मंत्रिमंडळाचे ६ महत्त्वाचे निर्णय

खूषखबर! आशा सेविकांच्या मोबदल्यात वाढ; राज्य मंत्रिमंडळाचे ६ महत्त्वाचे निर्णय

कापूस, सोयाबीनसाठी हजार कोटींचा निधी, राज्यात २७० टॅंकर्सनी पाणीपुरवठा, वाचा मंत्रिमंडळाचे निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सरकारी अधिकाऱ्यांचा सेवेदरम्यान मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांतील सदस्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात येणार आहे. आशा सेविकांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कृषी विभाग, राज्य तंत्रशिक्षण मंडळासह एकूण ६ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

रज्य मंत्रिमंडळाचे ६ महत्त्वाचे निर्णय

शासकीय अधिकाऱ्यांना देखील अनुकंपा नियुक्तीचे धोरण लागू. निधन झालेल्या अधिकाऱ्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास नियुक्ती देणार

कुटुंब न्यायालयातील सरळसेवेने नियुक्त न्यायाधीशांना जिल्हा न्यायाधीश (प्रथम प्रवेश,निवड श्रेणी, उच्च सयमश्रेणी) वेतनश्रेणी लागू

केंद्राच्या योजनांच्या निधी वितरण व विनियोग व्यवस्थापनाबाबत बँक खाती उघडण्यासाठी मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा

आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांचा मोबदला वाढविला

राज्य तंत्रशिक्षण मंडळ, अधिनियम-१९९७ मधील कलमांमध्ये सुधाणा

कृषी आधारित व अन्न प्रक्रिया उद्योगांना सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत मोठ्या व विशाल प्रकल्पांसाठी विहित गुंतवणूक रोजगाराचे निकष आणि प्रोत्साहाने सुधारित करणार

अनुकंपा नियुक्तीचे धोरण लागू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे. सध्या शासकीय सेवेतील एखाद्या गट क किंवा गट ड कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येते. आज राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे की, गट अ आणि गट ब मधील अधिकाऱ्यांच्या बाबतीतदेखील हे अनुकंपा धोरण लागू करावे. कोविड परिस्थितीत अनेक अधिकाऱ्यांचे निधन झाले असून अधिकारी संघटनांचीदेखील हे अनुकंपा धोरण लागू करण्याची मागणी होती. मुख्यमंत्र्यांनी या मागणीप्रमाणे कार्यवाही करण्याची सूचना केली होती. त्या अनुषंगाने आज यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणण्यात आला होता.

First Published on: August 26, 2021 6:13 PM
Exit mobile version