पावसाचे पाणी मुंबईकरांच्या घरात, मलाईच्या गोण्या कंत्राटदारांच्या खिशात, आशिष शेलार यांची टीका

पावसाचे पाणी मुंबईकरांच्या घरात, मलाईच्या गोण्या कंत्राटदारांच्या खिशात, आशिष शेलार यांची टीका

मुंबईत पावसाचे आगमन झाले असून पहिल्याच दिवसात सलग ३ ते ४ तास पाऊस पडल्यामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचले होते. यामुळे मुंबईतील अनेक भागात नदी नाल्यांसारखे पाणी साचले होते. मुबंईत पाणी साचणार नाही असे दावे करण्यात येऊनही मुंबईची तुंबई झाल्यामुळे भाजप नेत्यांनी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेवर टीका करण्यात आली आहे. डेब्रीजच्या गोण्या जशाच्या-तशा नाल्यात पावसाचे पाणी मुंबईकरांच्या घरात आणि मलाईच्या गोण्या मात्र कंत्राटदारांच्या खिशात अशा शैलीत भाजप नेते आशिष शेलार यांनी पालिका आणि शिवसेनेवर टिका केली आहे.

पहिल्या पावसामध्य मुंबई तुंबली दुर्दैवाने पहिल्या पावसामध्ये मुंबईकरांचा जीव टांगणीला लागला आहे. १०४ टक्के ते १६० टक्के नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे. प्रशासनानं काम केले नाही कंत्राटदारानं पळ काढला, सत्ताधाऱ्यांनी कंत्राटदाराच्या कुकृत्यावर पांघरुण घातले. संपुर्ण मुंबई दरवर्षाला ७० ते १०० कोटी रुपये केवळ नाले सफाईसाठी ५ वर्षात ५०० कोटी रुपये छोटे नाले असो, पाणी तुंबू नये म्हणून केलेली कामे असो यासाठी दरवर्षी प्रमाणे अधिकचे ५०० कोटी याचा अर्थ संपुर्ण पाच वर्षात १ हजार कोटी पण मुंबईकरांच्या नशीबात केवळ तुंबलेले पाणी घरात घुसण्याची स्थिती आहे.

आजही स्ट्रॉंग वॉटर ड्रेनमध्ये डेब्रीजच्या गोण्या पडल्या आहेत. मलाईच्या गोण्या कंत्राटदारांच्या खिशात गेल्या आहेत. मुंबईत ज्या ठिकाणी पाणी तुंबत नाही त्या ठिकाणी पाणी तुंबत आहे. उरलेल्या वेळात तरी मुंबईतील पाण्याचा निचरा होण्याची योग्य व्यवस्था करा अशी विनंती आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

दरम्यान आशिष शेलार यांनी पहिल्या पावसात मुंबईत तुंबल्यावरुन काव्यात्मक पद्धतीने सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. मुंबईत दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबलेय.. घरात पाणी घुसू लागलेय..नालेसफाई कधी 107%..कधी 104%… दाव्यांचे आकडे मोठे-मोठ्याने “वाझे”..पहिल्या पावसातच “कटकमिशन”चे सगळे व्यवहार उघडे!…मुंबईकर हो!… सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा…नेमेची येतो पावसाळा…पाच वर्षांत 1 हजार कोटींचा घोटाळा!!

First Published on: June 9, 2021 4:24 PM
Exit mobile version