ममता बॅनर्जी- आदित्य ठाकरेंच्या गुप्त बैठकीत काय ठरलं?, आशिष शेलारांचा सवाल

ममता बॅनर्जी- आदित्य ठाकरेंच्या गुप्त बैठकीत काय ठरलं?, आशिष शेलारांचा सवाल

भ्रष्टाचाराविरोधातील लढाई सुरू झालीय आणि यात जनताच जिंकेल, आशिष शेलारांचा मविआवर निशाणा

पश्चि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर आहेत. त्या मुंबईती उद्योगपतींच्या भेटीगाठी घेत असल्यामुळे भाजपकडून महाविकास आघाडी आणि ममतांवर टीका केली आहे. ममता बॅनर्जी आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या भेटीमध्ये काय ठरलं ते जाहीर का करत नाही? असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. शेलारांनी शिवसेनेच सगळे छुपे उद्योग उघडे पडले असल्याचे वक्तव्य केलं आहे. ममता बॅनर्जींना जो राजशिष्टाचार देण्यात आला तसा सन्मान इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना करणार का? असा सवालही आशिष शेलार यांनी केला आहे.

भाजप आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत शिवसेनेवर आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीगाठींवर जोरदार टीका केली आहे. शेलार म्हणाले की, महाराष्ट्रातील उद्योग, व्यवसाय शासकीय राजशिष्टाचारात पश्चिम बंगालला घेऊन जाण्यास परवानगी देणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेचे पितळ आता उघडं पडले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्राचे राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्यातील गुप्त बैठकीत काय ठरलं? का जाहीर करत नाही? असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना महाराष्ट्रात जो राजशिष्टाचार आणि सन्मान देण्यात आला तो अन्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा करणार का? असाही सवाल शेलार यांनी केला आहे. शिवसेनेचे सगळे छुपे उद्योग उघडे पडले आहेत. भांडे लपवत ताकाला जाणारे आम्हाला बेगडी ठरवतात? तसेच महाराष्ट्रात हास्यजत्रा सुरु असल्याचा टोला शेलार यांनी लगावला आहे.

प्रियांका चतुर्वेदींना सावरकर किती माहिती?

भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्या विधानावरुनही निशाणा साधला आहे. प्रियांका चतुर्वेदी यांनी सावरकरांवरुन वक्तव्य केल्यामुळे संसदेत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. यावर शेलार म्हणाले आहे की, कोण या प्रियांका चतुर्वेदी? खासदारकीसाठी त्या कुठल्या पक्षातून कुठे गेल्या आहेत? त्या सावरकरांशी कशाला तुलना करतायत? तुम्हाला सावरकर किती माहिती आहेत? सावरकर प्रेमी शिवसैनिक किती ओळखतात तुम्हाला? तसेच चतुर्वेदी यांना हिंदूह्रदयसम्राट तरी कळलेत का? असे अनेक सवाल आशिष शेलार यांनी केले आहेत.

संजय राऊतांचा शेलारांवर पलटवार

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजपवर हल्लाबोल केला आहे. राऊतांना आशिष शेलार यांनी रोजगारावरुन टीका केली असल्याचे सांगितले असता राऊत म्हणाले की, हे आरोप प्रत्यारोपांना अर्थ नाही. हा पोटशूळ आहे. ममता बॅनर्जी आल्या उद्योपतींना भेटल्या, मुंबई औद्योगिक देशाची राजधानी आहे. येथे उद्योगपती आहेत या उद्योगपतींचे देशभरात साम्राज्य आहे. फक्त मुंबईतच नाही. देशातील उद्योगपती मुंबईत गुंतवणूक करतील. ममतांनी म्हटलं आहे फक्त पश्चिम बंगालमध्येही लक्ष द्या असे संजय राऊत म्हणाले आहेत.


हेही वाचा : CM Uddhav Thackeray Discharge: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना २२ दिवसानंतर डिस्चार्ज


 

First Published on: December 2, 2021 12:28 PM
Exit mobile version