शपथविधीआधी ‘आदर्श’घोटाळ्याची फाईल उघडली; अशोक चव्हाणांना धक्का

शपथविधीआधी ‘आदर्श’घोटाळ्याची फाईल उघडली; अशोक चव्हाणांना धक्का

महिन्याभराच्या सत्तानाट्यानंतर अखेर राज्यात आज सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. राज्यात भाजपाला दूर ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसे आणि कॉंग्रेस पक्ष एकत्र आले आहेत. या तिन्ही पक्षांने एकत्र येऊन भाजपाला धक्का दिला आहे. मात्र, आता केंद्र सरकारने राज्यात स्थापन होणाऱ्या सरकारला पहिला धक्का दिला आहे. अंमलबजावणी संचलनायाने (ईडी) आदर्श सोसायटी घोटाळ्याची चौकशी पुन्हा केली आहे. त्यामुळे काँग्रेसकडून अशोक चव्हाण हे मंत्रिपदाची शपथ घेण्या अगोदरच त्यांना धक्का दिला आहे.

अशोक चव्हाण यांना धक्का

आदर्श प्रकरणात नाव असल्याने कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्री पद गेले होते. आता अशोक चव्हाण महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार असल्याची दाट शक्यता असताना ईडीने आदर्श प्रकरणाची पुन्हा एकदा फाईल उघडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आगे. त्याचवेळी अशोक चव्हाण देखील मंत्रिपदाची शपथ घेण्याची दाट शक्यता आहे. मात्र, त्याआधीच ईडीने आदर्श सोसयटी प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरु केली आहे.

यादरम्यान शिवसेनेकडून सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि जयंत पाटील मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. तसंच काँग्रेसकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण देखील मंत्रिपदाची शपथ घेणार आहे.


हेही वाचा – LIVE : अजित पवार ‘सिल्व्हर ओक’च्या दिशेने रवान


 

First Published on: November 28, 2019 1:21 PM
Exit mobile version