राज ठाकरेंप्रमाणे राणेही म्हणाले, ‘निवडणूक पुढे ढकला’

राज ठाकरेंप्रमाणे राणेही म्हणाले, ‘निवडणूक पुढे ढकला’

नारायण राणे

पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे भीषण अवस्था निर्माण झाली आहे. या पुरामुळे सांगली, कोल्हापूर भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली होती. आता राज ठाकरेंपाठोपाठ खासदार नारायण राणे यांनी देखील राज्यातील विविध भागांमधील पूरपरिस्थिती पाहता निवडणूक दोन महिने पुढे ढकलावी, अशी मागणी केली आहे. सिंधुदुर्गच्या पडवे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आपण विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – पूरग्रस्तांना मदत न करणाऱ्या बॉलिवूड कलाकारांना मनसेचा धोबीपछाड

काय म्हणाले नारायण राणे?

नारायण राणे म्हणाले की, ‘सध्याची पूरपरिस्थिती पाहता सरकारने निवडणुका पुढे ढकलण्याबाबत विचार करायला हवा. राज्यातील विविध भागांमध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थिती नंतर तेथील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी किमान दोन महिन्याचा कालावधी तरी लागेल. राज्याच्या निवडणुकीचा कालावधी हा सप्टेंबर आणि ऑक्टोंबरमध्ये असणार आहे. यावेळी पाऊसही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पहिल्या टप्प्यात विस्थापित झालेल्या जनतेच्या पुनर्वसनाबाबत प्राधान्य देऊन नंतर राज्याचा विधानसभा निवडणुकीबाबत विचाविनिमय व्हावा. शक्यता निवडणुका पुढे ढकलणे योग्य ठरेल.’

First Published on: August 12, 2019 8:11 PM
Exit mobile version