गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी, सुरतची जबाबदारी ठाण्यातील ‘या’ आमदाराच्या खांद्यावर

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी, सुरतची जबाबदारी ठाण्यातील ‘या’ आमदाराच्या खांद्यावर

ठाणे – पंढरपूर, गोवा आणि कोल्हापूर निवडणुकांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर आता भाजप श्रेष्ठींनी गुजरात निवडणुकीत सुरत जिल्ह्याची जबाबदारी ठाणे शहर मतदारसंघाचे आमदार संजय केळकर यांच्या खांद्यावर सोपवली आहे.

हेही वाचा – खबरदार! कामात दिरंगाई केल्यास होईल कारवाई; ठाणे महापालिकेचा आरोग्य कर्मचाऱ्यांना इशारा

डिसेंबरमध्ये गुजरात विधानसभेच्या निवडणुका होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. प्रचार, नियोजन आणि संघटन अशा आघाड्यांवर काम करण्यासाठी महाराष्ट्रातील ज्येष्ठ आमदार आणि लोकप्रतिनिधींना जबाबदारी देण्यात आली आहे. ठाणे शहर मतदारसंघाचे आमदार संजय केळकर यांना सुरत जिल्ह्यासाठी प्रवासी जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

हेही वाचा – प्रक्षोभक भाषण केल्याने विनायक राऊत, सुषमा अंधारे आणि भास्कर जाधवांविरोधात गुन्हा दाखल

सुरत जिल्ह्यात ओलपाड, गांगरोळ, मांडवी, कामरेज, बारडोली आणि महुआ हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. ओलपाड मतदारसंघात स्वतः आमदार  केळकर काम पाहणार असून त्यांना सहायक विकास पाटील आणि किरण धत्तूरे हे आहेत. गांगरोळमध्ये आमदार सिद्धार्थ शिरोळे, मांडवीमध्ये आमदार राम सातपुते, कामरेजमध्ये आमदार निरंजन डावखरे, बारडोलीमध्ये आमदार सुरेश भोळे आणि महूआमध्ये प्रदेश सचिव संदीप लेले काम पाहणार आहेत. आमदार केळकर हे उद्या गुरुवारी सुरतकडे रवाना होणार असून या सहाही मतदारसंघांत त्यांच्या नेतृत्वात चार दिवस दौरे होणार आहेत.

First Published on: October 12, 2022 8:42 PM
Exit mobile version