तीन महिने सरकार असताना कोणी अडवले होते?

तीन महिने सरकार असताना कोणी अडवले होते?

आगस्ट , सप्टेंबर व आक्टोबर असे तीन राज्यात भाजपाप्रणित सरकार राज्यात सत्तेवर होते आता शेतकर्‍यांसाठी सभागृहात गळे काढणार्‍यांना सत्तेत असतांना तीन महिने शेतकर्‍यांना मदत करण्यापासून कोणी अडवले होते ? त्यांचा हात कोणी धरला होता अशा शब्दात अर्थमंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खडसावले. तसेच एवढाच जर यांना पुळका आता आला असेल तर त्यांनी केंद्रात त्यांच्याच पक्षाचे सरकार सत्तेत असतांना शेतकर्‍यांच्या मदतीसाठी राज्याने जी १४ हजार ६०० कोटींची मदत मागितली आहे, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आमच्याबरोबर यावे असा सणसणीत टोलाही लगावला.

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदतीसाठी राज्य शासनाने 6 हजार 600 कोटी रुपये मंजूर केले असून यापैकी 2100 कोटी रूपये वितरीत करण्यात आले आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी आणि पुरग्रस्तांच्या मदतीकरिता राज्य शासनाने 14 हजार 600 कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे केली आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच मंजूर केलेल्या 6600 कोटी रुपयांपैकी 2100 कोटी रुपये जिल्हाधिकार्‍यांमार्फत वितरीत केले आहेत. उर्वरित रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे.राज्य शासनाने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 7400 कोटी रूपये तर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या मदतीसाठी 7200 कोटी रुपये अशी एकूण 14 हजार 600 कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे, अशी माहितीही जयंत पाटील यांनी दिली.

हे तर मगरीचे अश्रू
विरोधकांवर हल्लाबोल चढविला. विरोधकांची ही ओरड म्हणजे मगरीचे अश्रू असल्याची टीका जयंत पाटील यांनी यावेळी केली. तर जसा बाडगाला जोर आहे, तसा आमच्यातील काही आमदार तिथे गेलेल्यांना जोर असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. तर शेतकर्‍यांच्या मदतीसाठी आम्ही केंद्राकडे मदत मागितली असल्याचे जाहीर करतानाच त्यांना वार्‍यावर सोडले नसल्याचे दावा त्यांनी यावेळी केला.

First Published on: December 18, 2019 3:01 AM
Exit mobile version