संभाजीराजे छत्रपतींची ढाल करण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा फडणवीस आणि भाजपावर आरोप

संभाजीराजे छत्रपतींची ढाल करण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा फडणवीस आणि भाजपावर आरोप

राज्यसभा निवडणुकीच्या घडामोडीवरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या राज्यसभा उमेदवारीला शिवसेनेने (Shiv sena) पाठिंबा न दिल्यामुळे टीकेचे बाण सोडणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आता शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पलटवार केला आहे. ‘संभाजीराजे छत्रपती यांची कशाप्रकारे फसवणुक करण्यात आली हे, यामधून स्पष्ट झाले आहे. भाजपाला त्यांचा स्वत:चा उमेदवार उभा करायचाच होता. घोडेबाजार करायचाच आहे’, अशा शब्दांत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला टोला लगावला आहे.

संभाजीराजे छत्रपतींची ढाल

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर हल्लाबोल केला. राऊत म्हणाले,
“संभाजीराजे छत्रपती यांची कशाप्रकारे फसवणुक करण्यात आली हे, यामधून स्पष्ट झाले आहे. भाजपाला त्यांचा स्वत:चा उमेदवार उभा करायचाच होता. घोडेबाजार करायचाच आहे. पण त्यासाठी संभाजीराजे छत्रपतींची ढाल करण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.”

विजयासाठी जेवढी मत हवीत त्या मतांचा कोठा शिवसेनेकडे

“असो लोकशाही आहे, प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा आणि लढण्याचा अधिकार आहे. मात्र, महाराष्ट्रात कोणी घोडेबादार करून अशा पद्धतीच्या निवडणूका लढणार असतील, तर सरकारचेसुद्धा सर्व घडामोडींवर बारीक लक्ष्य आहे. आम्ही तर आमचा उमेदवार संजय पवार उतरवलेला आहे. त्यामुळे मला आणि मुख्यमंत्र्यांना पुर्ण खात्री आहे की, विजयासाठी जेवढी मत हवीत त्या मतांचा कोठा शिवसेनेकडे आहे. दोन्ही शिवसेनेचे उमेदवार जिंकतील. तसेच, महाविकास आघाडीचे आणखी दोन नेते म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे उमेदवारही विजयी होतील.”, अशा शब्दांत राऊत यांनी हल्लाबोल केला.

कॉंग्रेसमध्ये (Congress) गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत नाराजी पाहायला मिळते आहे. याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी कॉंग्रेसच्या अंतर्गत नाराजी विषयी मी बोलणं योग्य नाही. कोणत्या विषयावर नाराजी आहे हा त्यांच्या हायकमांडचा प्रश्न आहे.


हेही वाचा – चंद्रकांत पाटील पूर्वाश्रमीचे शिवसैनिक, संजय राऊतांचा दावा

First Published on: May 30, 2022 10:56 AM
Exit mobile version