केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या ताफ्यावर अंडे फेकण्याचा प्रयत्न

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या ताफ्यावर अंडे फेकण्याचा प्रयत्न

eggs, Minister Smriti Irani,BJP, NCP, अंडे, राष्ट्रवादी काँग्रेस, स्मृती इराणी, भाजप

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सोमवारी पुणे दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महागाईच्या मुद्यावर आंदोलन केले. याच दरम्यान स्मृती इराणी यांच्या गाड्यांचा ताफा जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या विशाखा गायकवाड यांच्याकडून त्यांच्या ताफ्यावर अंडे फेकण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतेल.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते गृहमंत्री अमित शाह यांच्या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडले. त्यावेळी स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात मोठा राडा पहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला सुरु होताच घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे भाजपला कार्यक्रम काहीकाळ थांबवावा लागला. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या घोषणाबाजी नंतर भाजपच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. यानंतर बालगंधर्व रंगमंदिर येथील स्मृती इराणी यांचा कार्यक्रम झाल्यावर त्यांच्या गाड्यांचा ताफा जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विशाखा गायकवाड यांनी अंडे फेकण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी विशाखा गायकवाड आणि त्यांच्या सोबत असलेल्या एका मुलाला ताब्यात घेतले असून चौकशीसाठी सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दुपारी चार वाजता सेनापती बापट रोडवरील एका हॉटेलमध्ये स्मृती इराणी यांचा कार्यक्रम सुरू असताना वाढत्या महागाई विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.
या आंदोलकांनी हॉटेलमध्ये जाऊन स्मृती इराणी यांना निवेदन देणार असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, आक्रमक कार्यकर्ते लक्षात घेता त्या सर्वांना आतमध्ये प्रवेश दिला नाही आणि त्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

First Published on: May 16, 2022 11:12 PM
Exit mobile version