औरंगाबाद : कोरोनाचा धोका वाढला; ७४ रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

औरंगाबाद : कोरोनाचा धोका वाढला; ७४ रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

२४ तासांच्या आत वैद्यकीय तपासणी करून अहवाल २४ तासांच्या आत द्यावा - आयुक्त

कोरोनाचा विळखा औरंगाबादमध्ये दिवसेंदिवस अधिकच घट्ट होताना दिसत आहे. औरंगाबादमध्ये ७४ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे हे रुग्ण शहराच्या विविध २५ भागातील आहेत. त्यामुळे आता कोरोनाग्रस्तांची संख्या ८२३ वर गेली आहे. तर गेल्या ८ दिवसांत औरंगाबादमध्ये ४४५ रुग्ण वाढले आहेत.

पुढील ३ दिवस कडकडीत बंद

औरंगाबादमध्ये वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीवरुन पुढील तीन दिवस कडकडीत बंद पाळला जाणार आहे. यामध्ये मेडिकल आणि रुग्णालय वगळता सर्वकाही बंद ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत. दरम्यान, संचारबंदी आणखी कडक केली जाणार असून वाहने बाहेर घेऊन फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.

औरंगाबादमध्ये गुरुवारी सकाळी तब्बल ५५ रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. यामुळे जिल्ह्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. मात्र, आजच्या दिवसात ही रुग्णसंख्या पुन्हा वाढल्याने भीती व्यक्त केली जात आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद शहरात आज कुठे किती रुग्ण सापडले?

First Published on: May 15, 2020 12:18 PM
Exit mobile version