फ्लिपकार्टवरुन मागवला मोबाईल मिळाली वीट

फ्लिपकार्टवरुन मागवला मोबाईल मिळाली वीट

गजानन खरात

जगभरात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खरेदी विक्री होत आहे. लोकांचाही ऑनलाईन खरेदीकडे कल असल्याचे पहायला मिळत आहे. दुकान किंवा मॉलपेक्षा वस्तू ऑनलाईन खरेदी करताना कमी किंमतीत मिळतात. परंतु ऑनलाईन खरेदीमध्येही फसवणुकीचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. औरंगाबादमध्ये एका ग्राहकाला अशाच फसवणुकीला सामोरे जावे लागले आहे. त्याने फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग साईटवरुन मोबाईल मागवला. परंतु जे पार्सल त्याला मिळाले त्या पार्सलमध्ये त्याला वीट मिळाली. औरंगाबाद मधील मयूर पार्क परिसरात राहणाऱ्या गजानन खरात या ग्राहकाने फ्लिपकार्टवरून मोबाईल ऑर्डर केला होता. मात्र त्याला मोबाईल ऐवजी वीट मिळाल्याचा आरोप त्याने केला आहे. त्यामुळे गजानन यांना या वीटेसाटी नऊ हजार रुपये मोजावे लागले आहेत. ९ ऑक्टोबर रोजी गजानन यांनी फ्लिपकार्टवरून मोबाईल मागवला होता. १४ ऑक्टोबर रोजी त्याना तो मोबाईल मिळाला. परंतु पार्सल उघडल्यावर त्यामध्ये त्यांना वीट आणि प्लास्टिकच्या पिशव्या मिळाल्या. आपली फसवणूक झाल्याचे पाहून गजानन यांच्या पायाखालची जमीन हादरली.

त्यानंतर गजानन यांनी फ्लिपकार्ट कंपनीच्या कस्टमर केअर सेंटरशी संपर्क साधला. त्यावर त्यांना उडवउडवीची उत्तरे मिळाली. त्यामुळे गजानन यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले आणि त्यांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. औरंगाबाद शहरातील हरसूल पोलीस ठाण्यात फ्लिपकार्ट आणि कुरिअर कंपनी विरोधात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.

First Published on: October 17, 2018 9:58 PM
Exit mobile version