औरंगाबादमध्ये कोरोनाचे ३१ नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या ५०८ वर

औरंगाबादमध्ये कोरोनाचे ३१ नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या ५०८ वर

कोरोना विषाणू

कोरोनाचा विळखा औरंगाबादमध्ये दिवसेंदिवस अधिकच घट्ट होताना दिसत आहे. औरंगाबादमध्ये शुक्रवारी तब्बल ९० नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे औरंगाबादमधील कोरोनाबाधितांची आकडेवारी ४६८ वर गेली होती. दरम्यान, आज सायंकाळपर्यंत ३१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे औरंगाबादमधील कोरोनाबाधितांचा आकडा ५०८ वर गेला आहे. शनिवारी सकाळी १८, दुपारी ३ आणि सायंकाळी १० असे एकूण ३१ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

या ठिकाणी आढळले रुग्ण

औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये संजयनगर मुकुंदवाडी येथील ६, कटकटगेट भागातील २, बाबर कॉलनीतील ४, आसेफीया कॉलनीतील १, भवानीनगर भागातील २, रामनगर, मुकुंदवाडी येथील १ आणि सिल्क मिल कॉलनीतील १ असे १७ जण आढळून आले आहेत. तर तर रोशनगेट येथे आढळून आलेला १ अशा १८ जणांचा समावेश आहे. त्यानंतर आढळून आलेल्या ३ रुग्णांमध्ये सातारा येथील ५० वर्षीय पुरुष, पाणचक्की येथील ३५ वर्षीय महिला आणि जुना बाजार येथील ७५ वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता आणखी १० जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात तब्बल ९ जण पुंडलीकनगरचे आहेत. तर गंगापूर येथील एकाचा समावेश कोरोनाबाधितांमध्ये आहे. त्यामुळे सायंकाळपर्यंत एकूण ३१ जण वाढल्याने औरंगाबादमधील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या ५०८ वर गेली आहे.

देशातही कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३ हजार ३२० नवे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंतची एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५९ हजार ६६२ झाली असून लवकरच ती ६० हजारांचा टप्पा पार करणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत ९५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांचा आकडा १ हजार ९८१ वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत १७ हजार ८४७ रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.


हेही वाचा – नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित पोलिसाचा पहिला बळी


First Published on: May 9, 2020 7:53 PM
Exit mobile version