सीईटीच्या ‘पीसीएम’चे हॉलतिकीट संकेतस्थळावर उपलब्ध

सीईटीच्या ‘पीसीएम’चे हॉलतिकीट संकेतस्थळावर उपलब्ध

१२ ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या एमएचटी- सीईटीच्या पीसीएम ग्रुपसाठीचे हॉल तिकिट राज्य सीईटी सेलकडून रविवारपासून संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांनी https://mhtcet2020.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरून हॉलतिकिट डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन सीईटी सेलकडून करण्यात आले आहे. राज्य सीईटी कक्षाकडून घेण्यात येत असलेल्या एमएचटी सीईटीच्या पीसीबी ग्रुपच्या परीक्षेला १ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली.

सीईटी सेलकडून फिजिक्स-केमिस्ट्री-मॅथ्स (पीसीएम) ग्रुपची परीक्षा १२,१३,१४,१५,१६,१९ आणि २० ऑक्टोबरला जाहीर केली आहे. या ग्रुपची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना रविवारपासून संकेतस्थळावर हॉल तिकिट उपलब्ध करून देण्यात आले. यासंदर्भातील लिंक आणि सविस्तर माहिती संकेतस्थळावर दिली आहे. एमएचटी सीईटी परीक्षेसाठी पीसीएम ग्रुपच्या परीक्षेसाठी देशभरातून १ लाख ६६ हजार १०७ विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे. यामध्ये राज्यातून १ लाख ५० हजार ८९ विद्यार्थी तर परराज्यातून १६ हजार १८ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे. यंदा परीक्षा तालुकास्तरावर घेण्यात येणार आहेत. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक व माहितीसाठी सीईटी सेलच्या www.mahacet.org आणि https://mhtcet2020.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली आहे.

First Published on: October 4, 2020 4:56 PM
Exit mobile version