कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला बहुजन महापार्टीचा पाठिंबा, उमेदवारासाठी करणार प्रचार

कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत असून या मतदारसंघातून काँग्रेसच्या जयश्री जाधव उमेदवार आहेत. या मतदारसंघात उमेदवार उभा न करता काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय बहुजन महापार्टीने घेतला आहे. कोल्हापूरमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसनं जोरदार तयारी केली आहे. भाजपकडून कोल्हापूरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात शक्तीप्रदर्शन करण्यात आले. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. तर काँग्रेसच्या उमेदवारासोबत मोजकेच लोकं उपस्थित होते.

भारतीय जनता पक्ष हा जातीयवादी पक्ष असून देशात महागाई, अन्याय अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. भाजपासारख्या जातीयवादी पक्षाला रोखणे गरजेचे असून त्याचसाठी काँग्रेस उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत बहुजन महापार्टी काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचे पत्र या पक्षाचे राष्ट्रीय महासचिव शमशुद्दीन खान यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले आहे. बहुजन महापार्टीचे कार्यकर्ते काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करून त्यांना विजयी करण्यासाठी मेहनत करतील असे बहूजन महापार्टीने म्हटले आहे.


हेहा वाचा : नारायण राणे, कृपाशंकर सिंहांवरील सोमय्यांच्या आरोपाचे काय झाले?, नाना पटोलेंचा सवाल

First Published on: March 23, 2022 6:57 PM
Exit mobile version