राज ठाकरेंची उद्या पत्रकार परिषद; शिवसेना- मनसे युतीवर करणार का भाष्य?

राज ठाकरेंची उद्या पत्रकार परिषद; शिवसेना- मनसे युतीवर करणार का भाष्य?

राज्यातील सत्तासंघर्षानंतर आता उद्धव ठाकरेंची शिवसेना एकटी पडल्याचे चित्र राजकीय वर्तुळात दिसतेय. यामुळे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना साथ द्यावी अशी मागणी शिवसेना कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. अशातच शिवसेनेने साद घातली तर येऊ देत असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी केले होते. यावरून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची राजकारणात रंगतेय. यातच शस्त्रक्रियेनंतर आता राज ठाकरे पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. आज राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकांबाबत रणनिती आखण्यात आल्याची माहिती आहे. यासोबत राज ठाकरे उद्या पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. शर्मिला ठाकरेंच्या विधानानंतर राज ठाकरे उद्याच्या पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान राज ठाकरेंची अयोध्या दौऱ्यानंतर एक शस्त्रक्रिया पार पडली. यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्याचे दिसून आल्या. आजच्या बैठकीत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सध्याच्या अस्थिर राजकारणाचा फायदा घेत कामाला लागण्याची सुचना दिल्या आहेत. यानंतर पुन्हा ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. यानंतर ते पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र दौऱ्याबाबतही स्पष्टीकरण देतील असे बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.

दरम्यान मनसेने 25 तारखेपासून राज्यभरात सदस्य नोंदणी सुरु केली आहे. ज्यामाध्यमातून राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्याचे आवाहन केले आहे. तसेच जास्तीत जास्त लोकांच्या सदस्य नोंदणीसाठी काम करण्याचे आवाहन केले आहे.

राज्यातील सत्ता संघर्षात आता ठाकरे बंधु एकत्र येणार का? या प्रश्नावर शर्मिला ठाकरेंनी दिलेल्या उत्तरामुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे. शर्मिला ठाकरेंच्या या विधानानंतर पुन्हा एकदा राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षात युती होणार असल्याची चर्चा रंगतेय. यावरही बाळा नांदगावकर यांनी भाष्य करत मनसे शिवसेना युतीवर राज ठाकरेचं बोलतील असे स्पष्ट केले.


राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?, भास्कर जाधव स्पष्टच बोलले

First Published on: August 22, 2022 2:09 PM
Exit mobile version