चिखलफेक थांबवून जनतेच्या प्रश्नावर लक्ष घाला, बाळा नांदगावकर यांचा संताप

चिखलफेक थांबवून जनतेच्या प्रश्नावर लक्ष घाला, बाळा नांदगावकर यांचा संताप

चिखलफेक थांबवून जनतेच्या प्रश्नावर लक्ष घाला, बाळा नांदगावकर यांचा संताप

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झाला नाही आहे. अजूनही काही जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे कोरोनामुळे अनेक परिवार उध्वस्त झाले आहेत अनेकांच्या कुटुंबाची आर्थिक गणित बिघडले आहेत. राज्यातील जनता त्रस्त असतानाही सत्ताधारी व विरोधी पक्ष हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत. आता राज्यातील जनतेला गरज आहे ती मदतीची त्यामुळे अनलॉक करताना हि चिखलफेक थांबवून जनतेचे प्रश्नांवर लक्ष घाला अशी मागणी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

राज्यातील जनता कोरोना आणि लॉकडाऊनमुळे प्रचंड निराश झाली आहे. अनेकांची कुटुंबं या कोरोनामुळे उध्वस्त झाले आहेत. परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लसीसाठी वणवण करावे लागत आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिला डोस मिळाला आहे त्यांना दुसरा डोस मिळत नाही आहे. त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ यामध्ये लक्ष देऊन विद्यार्थ्यांना दिलासा दिला पाहिजे अशीही मागणी बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

“जनता कोरोना ने परेशान आहे. अनेकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. परंतु सत्ताधारी व विरोधी पक्ष हे एकमेकांना झोडण्यात मग्न आहेत. यात कोण बरोबर आणि कोण चूक ह्यात मला पडायचे नाही. पण आता जनतेला गरज आहे ती मदतीची त्यामुळे आता “अनलॉक” करताना हि चिखलफेक थांबवून जनतेच्या प्रश्नात लक्ष घाला हीच सर्वांची ईच्छा आहे. शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिला डोस घेऊन ४ आठवडे झाले अशा विद्यार्थ्यांना २ रा डोस प्राथमिकतेने देण्यात यावा.कारण त्यांचे शैक्षणिक वर्ष जे आता लवकर च सुरु होईल त्या करिता त्यांना लस हि अनिवार्य आहे. तसेच अनेकांना १५ जून आधी तेथील युनिव्हर्सिटीत हजेरी लावणे गरजेचे आहे. त्यामुळे या विषयी त्वरित निर्णय घेऊन दिलासा द्यावा” अशा आशयाचे ट्विट बाळा नांदगावकर यांनी केले आहे.

First Published on: June 4, 2021 6:52 PM
Exit mobile version