सावरकरांच्या जन्मस्थळी बंदची हाक; भाजपा, शिंदे गटाची निदर्शने

सावरकरांच्या जन्मस्थळी बंदची हाक; भाजपा, शिंदे गटाची निदर्शने

नाशिक : राहुल गांधी यांच्या स्वातंत्रवीर सावरकर यांच्या बाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या भगुर या सावरकरांच्या जन्मस्थळी भाजप आणि शिवसेना (शिंदे) याच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येत आहे.  राहुल गांधींच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भगुर मध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. तर, दुसरीकडे मनसेसह इतरही काही सामाजिक संघटनांनी या आंदोलनाला आणि बंदला पाठींबा दिला आहे.

राहुल गांधी यांची अत्यंत महत्वाकांशी मानली जाणारी ‘भारत जोडो यात्रा’ मागील १० दिवसापासून महाराष्ट्रातून प्रवास करत आहे. यात्रे दरम्यान राहुल गांधी ठिकठिकाणी सभाही घेत आहे. अश्याच वाशिम येथील सभेत गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबाबत अपमानजनक वक्तव्य केल होत. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकरणात मोठा वादंग निर्माण झाले आहे. भाजपा, शिवसेना (शिंदे गट), मनसे आदि राहुल गांधींच्या विरोधात राज्यभर मागील २ दिवसापासून आंदोलन करत आहे.

दरम्यान, भाजपा, शिवसेना (शिंदे गट) यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांचे जन्मस्थळ असलेल्या भगुर येथे राहुल गांधींच्या विरोधात जोडा मारो आंदोलन केले. तसेच भगुर बंदचीही हाक देण्यात आली आहे. बंदला उत्स्फूर्त पाठींबा मिळाल्याचे चित्र भगुरमध्ये बघायला मिळाले.

 भगूर हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जन्मभूमी असून संपूर्ण देशाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अभिमान आहे. त्यांनी केलेला त्याग आणि त्यांनी दिलेला बलिदान हे खूप मोठे असून संपूर्ण देशातल्या नागरिकांना माहिती आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं काय योगदान आहे? काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना माहितीच नाही. त्यांनी केलेला त्याग, त्यांचे बलिदान या सगळ्यांची माहिती राहुल गांधींना नसल्याने ते बरळत आहे. : हेमंत गोडसे, खासदार, शिवसेना (शिंदे गट)

First Published on: November 18, 2022 2:25 PM
Exit mobile version