Lockdown : बँक ग्राहकांनी ऑनलाइन फसवणुकीला बळी पडू नये!

Lockdown : बँक ग्राहकांनी ऑनलाइन फसवणुकीला बळी पडू नये!

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे काही देशातील नागरिक आपापल्या घरी अडकले आहे. यावेळी सायबर गुन्हेगार आणि फसवणूक करणारे सामान्य नागरिकांच्या कमाईवर हात साफ करण्यासाठी रोज नवे नवे फंडे आजमावत आहेत. त्यामुळे भारतीय स्टेट बँकेने नुकतेच फसवणूक संदर्भात जागृत केले आहे. एसबीआयने ट्विट करून सांगितले की, फसवणूक करणारे सायबर क्राईमसाठी नवनवीन फंडे बाहेर काढत आहेत. बँकेचे ट्विटरद्वारे दिलेल्या सूचनेनुसार, फसवणूक करणारे लोक ग्राहकांना मेसेज पाठवून पासवर्ड किंवा अकाउंट इन्फॉर्मेशन अपडेट करण्यासाठी सांगतात. तसेच एक लिंक ही पाठवली जाते. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, लिंक ओपन केल्यावर बँकेच्या नेट बँकिंग सारख्या दिसणाऱ्या पेजवर जातो. लोकांना वाटत आपण बरोबर पेज ओपन केले आहे. आणि नेट बँकिंगच्या आयडी आणि पासवर्डवरून लॉग इन करण्याची मोठी चूक केली जाते. ठग याच संधीचा फायदा घेऊन लोकांच्या अकाउंटमधून
त्याची कित्येक वर्षाची मेहनतची कमाई काही क्षणात लंपास केली जाते.

एसबीआयने सांगितले की, कोणाला अशा प्रकारचा मेसेज आला तर तो लगेच डिलीट करणे. तसेच लिंकवर क्लिक करू नये आणि पासवर्ड व इतर कोणतीही गोपनीय माहिती कोणाही देऊ नये. अशा प्रकारची कोणतीही घटना दिसून आली तर तात्काळ बँकेने दिलेल्या इमेल आयडीवर सूचित करावे. epg.cms@sbi.co.in और phishing@sbi.co.in हे दोन ईमेल आयडी आहेत. बँकेने ग्राहकांना आलेल्या संदेशची माहिती सरकारच्या सायबर क्राईम शाखेला देण्याची व्यवस्था केली आहे. SBI ने लोकांना बँकेच्या नावे चालणारी बोगस वेबसाईट http://www.onlinesbi.digital या बाबत सतर्क केले आहे. बँक ग्राहकांनी अशा मेसेजवर लक्ष देेवू नये, असेही बँकेने सांगितले.

First Published on: April 15, 2020 10:46 AM
Exit mobile version