सचिन वाझेला अडीच लाखांचा हप्ता देणारे बार मालक ED च्या रडारवर

सचिन वाझेला अडीच लाखांचा हप्ता देणारे बार मालक ED च्या रडारवर

सचिन वाजेला दरमहा अडीज लाख रुपयाचा हप्ता देण्यात येत होता असे अंधेरीच्या एका बार मालकाने सीबीआयला दिलेल्या जबाबानंतर मुंबईतील बार मालक ईडीच्या रडारवर आले आहे. ईडीने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटीच्या कथित वसुलीच्या आरोपाबाबत मुंबईतील ५ बारमालकांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. या बार मालकांमध्ये अंधेरीतील बार मालकाचा समावेश आहे.  
 
मुंबई पोलीस दलाचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याच्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुली करून देण्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. सीबीआयने याप्रकरणी अनिल देशमुख यांच्यासह आठ जणांचे जवाब नोंदवून अनिल देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान सीबीआयने अंधेरी येथील एका बार मालकाचा जवाब नोंदवला असता या बार मालकाने दिलेल्या कबुली जबाबात तो दरमहा बडतर्फ पोलीस अधिकारी याला अडीज लाख रुपयाचा हप्ता देत असल्याची कबुली दिली होती. मात्र हि रक्कम सचिन वाजे पुढे कुणाला द्यायचा याबाबत याबाबत मात्र या बार मालकाला काहीच माहीत नसल्याचे चौकशीत समोर आले होते. 
 
ईडीने देखील याची गंभीर दाखल घेत मुंबईतील बारमधून दरमहा किती हप्ता दिला जात होता याची चौकशी करण्यासाठी मुंबईतील बार मालकाची यादी तयार करून बारमालकाचा जबाब नोंदवणे सुरु केले आहे. ईडीने सोमवारी मुंबईतील ५ बार मालकांना चौकशीसाठी समन्स जारी केले असून त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यलयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या बार मालकाकडून कुणाला किती रुपयाची रक्कम पोहचवली जाते याबाबत माहिती मिळवण्यात येणार असल्याची माहिती ईडीच्या सुत्रानी दिली आहे. या बार मालकाच्या जबाबा वरून ईडीकडून तपासाची पुढील  सूत्रे फिरवण्यात येणार असल्याचे समजते.
First Published on: May 25, 2021 7:58 PM
Exit mobile version