Barasu Refinary: महाराष्ट्रात राख आणि गुजरातला रांगोळी; ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Barasu Refinary: महाराष्ट्रात राख आणि गुजरातला रांगोळी; ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

आमचाही समान नागरी कायद्याला पाठिंबा, पण...; ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट

मागच्या काही दिवसांपासून कोकणातील रत्नागिरी, बारसू येथे होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध होत आहे. यावरच राजकीय वातावरण तापलं असताना, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे 6 मे ला बारसूला जाणार आहेत. त्याचवेळी बारसू समर्थकांचा मोर्चाही निघणार आहे. अशातच, बारसूवरुन अजून वातावरण तापण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात राख आणि गुजरातला रांगोळी ? असं या सरकारचा हेतू आहे का? असा प्रश्न उपस्थित होत असल्याचं म्हणत ठाकरेंनी पुन्हा बारसू प्रकरणात भाजपवर हल्ला चढवला आहे. ( Barasu Refinery Uddhav Thackeray attack on BJP on Barasu Refinary Project )

तर प्रकल्प जाऊ का दिले?

ठाकरे म्हणाले की, आमचं सरकार पाडल्यानंतर राज्यात येणार चांगले प्रकल्प वेदांत फॉक्सकॉन, टाटा एअरबस हे प्रकल्प गुजराकडे का वळवले? त्यामुळे माझ्या मुख्यंमत्री असतानाच्या काळात येणारे प्रकल्प तुम्ही जाऊ का दिले? म्हणजे याचाच अर्थ असा की, महाराष्ट्राला राख आणि गुजरातला रांगोळी, असा मी याचा अर्थ काढायचा का? त्यामुळे मला विरोध करण्यापेक्षा लोकांची बाजू घेऊन प्रकल्पाला विरोध करा आणि जर प्रकल्प चांगला असेल तर लोकांच्या मनातील समजूती, गैरसमज दूर करा आणि ते दूर करता येत नसेल तर प्रकल्प दूर करा. लोकांकडून बळजबरी परवानग्या घेऊ नका, असं ठाकरे यावेळी म्हणाले.

मोदींना विरोध नाही, पण…

बारसूबाबत अजून कोणताही निर्णय नाही, फक्त माती परिक्षण सुरु आहे, नंतर ग्रामस्थांना विचारात घेऊन निर्णय घेण्याचा सरकारचा विचार असल्याचा प्रश्न विचारल्यावर ठाकरे म्हणाले की, मग पोलिसांचं बळ वापरून का माती परिक्षण केंल जात आहे. जसा मी लोकांसमोर जातोय, तुम्ही जा आणि लोकांचे प्रश्न सोडवा. पालघरमध्ये जसं घरात घुसून आदिवासिंना बाहेर काढलं जात आहे, ही कोणती लोकशाही आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे म्हणूनच मी मोदींविरोधत नाही तर हुकुमशाही वृत्तीच्या विरोधात आहे.

केंद्रातून दबाव नाही आग्रह

बारसूची जागा सुचवण्यासाठी केंद्राकडून आग्रह होता की दबाव? यावर उत्तर देताना, ठाकरे म्हणाले की, माझ्यावर दबाव नाही, तर आग्रह होता. मलाही तेव्हा असं वाटलं की प्रकल्प चांगला असेल आणि तिथल्या जनतेने होकार दिला आणि सगळ्यांचं चांगलं होणार असेल तर, मी का थांबवावं म्हणून मी ही जागा सुचवल्याचं ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.

First Published on: May 4, 2023 2:22 PM
Exit mobile version