Beed : पार्किंगवरून बीडमधील वैद्यकीय महाविद्यालयात दोन गटांत हाणामारी; 16 जणांवर गुन्हा दाखल

Beed : पार्किंगवरून बीडमधील वैद्यकीय महाविद्यालयात दोन गटांत हाणामारी; 16 जणांवर गुन्हा दाखल

टॅक्सी ड्रायव्हरने बॅचलर असल्याचे भासवून मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवले, नंतर सत्य समोर आल्यावर तिची हत्या

बीड : बीडमधील अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात दोन गटांत हाणामारी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दोन गटांत झालेल्या हाणामारीचे काण अद्याप अस्पष्ट आहे. परंतू, हाणामारी झाल्याने महाविद्यालयातील सुरक्षा रक्षकांनी लाठीचार्ज करत दोन्ही गटातील लोकांना लांब करत परिस्थिती नियंत्रणात आणल्याची माहिती मिळते. (beed news clash between two groups in ambejogai medical college)

मिळालेल्या माहितीनुसार, बीडमधील अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील अपघात कक्षात दोन गट आमनेसामने आले. पार्किंगच्या वादातून ही धक्कादायक घटना झाल्याचे समोर आले आहे. रविवारी रात्री दोन पार्किंगवरुन वाद सुरू झाला आणि रुग्णालयातील अपघात विभागातच दोन गट भिडले. रात्री 10 वाजताच्या सुमारास घडलेला हा राडा जवळपास 10 ते 15 मिनिटे चालला. या सर्व हाणामारीच्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महाविद्यालयाच्या अपघात कक्षात झालेल्या या तुफान राड्यामुळे काहीकाळ कर्मचारी आणि रुग्णांमध्ये भीती वातावरण निर्माण झाले होते. पण परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने महाविद्यालयातील सुरक्षारक्षकांना सैम्य लाठीचार्ज देखील करावा लागला. दोन गटांतील ही हाणामारी कशामुळे झाली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाच्या वतीने अंबेजोगाई पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. प्राप्त तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी दोन्ही गटातील 16 जणांवर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

बिअरबारसमोर गुरूजींचा राडा

शाळेतील किरकोळ वादातून दोन सहशिक्षकांनी मुख्याध्यापकावर बतईने प्राणघातक हल्ला केला. ही घटना 12 मार्च रोजी दुपारी 4 वाजता गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी जवळील एका बिअरबारसमोर घडली. यातील जखमी मुख्याध्यापकावर सध्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी या दोन्ही सहशिक्षकांवर गेवराई पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.


हेही वाचा – Crime News : गुंतवणुकीच्या नावाने व्यावसायिकाने घातला 1.64 कोटींचा गंडा

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 22, 2024 9:19 AM
Exit mobile version