३६५ गुन्हे उघडकीस आणणाऱ्या श्वानाचे निधन; ‘रॉकी’ला अलविदा करताना गृहमंत्री भावनिक

३६५ गुन्हे उघडकीस आणणाऱ्या श्वानाचे निधन; ‘रॉकी’ला अलविदा करताना गृहमंत्री भावनिक

बीड पोलीस दलातील श्वानाचं काल १५ ऑगस्टला दीर्घ आजाराने दु:ख निधन झालं. निधन झालेल्या श्वानाचे नाव रॉकी असं आहे. रॉकीच्या जाण्याने बीड पोलिसांनी हळहळ व्यक्त केली. तर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख रॉकी’ला अलविदा करताना भावनिक झाले. अनिल देशमुख यांनी ट्वीट करत रॉकीला श्रद्धांजली वाहिली.

“आमच्या बीड पोलीस दलातील रॉकी नामक श्वानाचे काल दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. भावपूर्ण श्रद्धांजली! दहशतवादी हल्ले, बॉम्बशोधक, बॉम्बनाशक पथके, गुन्ह्यांची उकल आणि सभा बंदोबस्त इ. विषयांच्या संदर्भात महाराष्ट्र पोलीस दलातील श्वानपथक महत्वाची भूमिका बजावत असते. महाराष्ट्र पोलीस दलातील तंत्रशुद्ध प्रशिक्षणाने तयार झालेले श्वान हजारो नागरिकांचे जीवन वाचविण्याचे काम करत आले आहेत. रॉकीने आजपर्यंत ३६५ गुन्हे उघडकीस आणण्यात मोलाची भूमिका बजावली होती. बीड पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा एक प्रामाणिक योद्धा आम्ही रॉकीच्या जाण्याने गमावला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त मन हेलावून टाकणारे आहे. रॉकीने केलेली कामगिरी माझ्यासह बीड पोलीस दलाच्या मनात सदैव घर करून राहील,” अशी भावनिक पोस्ट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.

 

 

First Published on: August 16, 2020 4:20 PM
Exit mobile version