बेस्ट, एसटीला २९० कोटीचा निधी

बेस्ट, एसटीला २९० कोटीचा निधी

मुंबई : कोरोनातील लॉकडाऊनच्या काळात बेस्टने पुरवलेल्या सुविधा आणि मिशन बिगिन अंतर्गत एसटीने पुरवलेल्या बस सेवेबद्दल राज्याच्या महसूल विभागाने या दोन्ही उपक्रमांना २९० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना काळात वाहतूक सेवेपासून इतर काही सेवा पुरवण्यासाठी बेस्ट उपक्रमाची मोलाची मदत झाली होती. कोरोना संसर्ग अत्युच्च पातळीवर असताना बेस्टच्या कर्मचा-यांनी जीवावर उदार होऊन प्रवासी सेवा पुरवली. यामध्ये बेस्टच्या वाहक, चालकांसह अन्य काही कर्मचा-यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पण तरीही प्रवासी सेवा अविरत सुरु ठेवली होती.

कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्यावर मिशिन बिगिन अंतर्गत राज्यामध्ये प्रवासी वाहतूक सुरु ठेवण्यासाठी एसटीच्या बसेस भाड्याने घेतल्या होत्या. त्यामुळे आपत्कालीन विभागासह अन्य काही विभागामधील कर्मचा-यांना कामावर जाणे सोपे झाले.

दरम्यानच्या काळात बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून निधी मिळण्याच्या मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. यावर निर्णय घेण्यासाठी राज्य कार्यकारी समितीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीतील निर्णयानुसार बेस्ट आणि एसटी महामंडळाला २९० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली.


हेही वाचा: …तर रझा अकादमीवरही कारवाई होणार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा इशारा


 

First Published on: November 18, 2021 8:32 PM
Exit mobile version