केंद्र सरकारने ९३ देशांना लसींचे डोस विकले, लसीकरणावरुन भाई जगताप यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

केंद्र सरकारने ९३ देशांना लसींचे डोस विकले, लसीकरणावरुन भाई जगताप यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

आगामी निवडणुकीत आम्हाला एकटं लढू द्या, काँग्रेसला तिसरा पक्ष म्हटलं जातंय - भाई जगताप

देशात कोरोनाच्या संकटामुळे दयनीय परिस्थिती आहे. दुर्दैव असे आहे की, जगभरातल्या देशांकडून माझ्या देशाने काय शिकले असा जर मी प्रश्न केला तर त्याचे उत्तर मालाही सापडत नाही आहे. देशात १८ ते ४४ वयोगटातील नागिरकांचे लसीकरण करायला हवे होते परंतु त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी असे कस बोलू शकतात की राज्य सरकारने याची जबाबदारी घ्यावी. एकीकडे असे सांगायचे आणि दुसरीकडे लसीचा पुरवठा होणार आहे त्याबाबतीत रेशनिंग करायचे अशी परिस्थिती विचित्र आहे. असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप यांनी म्हटले आहे. भाई जगताप यांनी लसीकरणावरुन केंद्र सरकारच्या धोरणावर आणि केंद्राच्या भूमिकेवर हल्लाबोल केला आहे.

देशात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येने भयानक परिस्थिती निर्माण होत आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचे कोरोनाविरोधी लसीकरण केंद्र सरकार करत आहे. परंतु १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करायला हवे होते त्याबाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी असे कस म्हणू शकतात की राज्य सरकारने याची जबाबदारी घ्यावी. जगभरातून माहिती मिळवी असता असे समजले आहे की, त्या त्या देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी देशातील नागरिकांचे लसीकरण करुन घेतले आणि तेही मोफत केले आहे. माझ्या देशात पंतप्रधान सांगतात कोरोना संपला असे पंतप्रधान कसे सांगू शकतात असा सवाल भाई जगताप यांनी उपस्थित केला आहे.

पंतप्रधान मोदी देशातील नागरिकांची लस बाहेरील देशात पाठवतात भाजपचे नेते त्यांचे समर्थन करतात. मान्य आहे की, बाहेरील देशातून कच्चा माल येतो त्यामुळे त्यांना द्यावे लागते परंतु ९३ देशांशी आपला करार नाही. त्यांना आपण १५० रुपयांनी लस विकायची आणि आम्हाला आता स्पुटनिक लसीचा डोस घ्यायला १००० रुपये मोजावे लागतात. हा काय प्रकार आहे आम्हाला कळत नाही. याबाबतीत मोदी सरकारचा निषेध करतो आहे. राज्यातील विरोधी पक्षनेत्यांचा आणि विरोधी पक्षाचाही निषेध करत असल्याचे भाई जगताप यांनी सांगिले आहे.

आंदोलन अधिक तीव्र करणार

यापुर्वीही देशात अनेक लसी उपलब्ध झाल्या आहेत. पोलिओसारख्या १३ लसींसाठी कधी लाईन लावाली लागली नाही. सर्व लसींचे डोस मोफत देण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणाविरोधात मंगळवार पासून आंदोलन करण्यात येणार आहे. मोदी आमच्या मुलांची लस परदेशात का पाठवली अशा वाक्याचे बॅनर आम्ही लावले होते. या बॅनरला फाडण्याचा, काढण्याचा प्रयत्न झाला परंतु आम्ही तिथे नवीन बॅनर लावले आहेत. हे आंदोलन आता अधिक तीव्र करण्यात येणार आहे. उत्तर मुंबई जिल्ह्यातून याची सुरुवात करण्यात येणार आहे. १० ते ११ या १ तासाच्या वेळेत प्रत्येक विधानसभा क्षेत्रात मार्केटच्या ठिकाणी किंवा लसीकरण केंद्राच्या ठिकाणी मानवी साखळी तयार केले जाणार आहेत. मोदीजी हमारी बच्चों की व्हॅक्सीन विदेश क्यों भेजी असे वाक्य असलेले टीशर्ट घालून उभे राहणार आहेत.

First Published on: May 24, 2021 3:32 PM
Exit mobile version