Bhandara Hospital Fire Case: आगीतून बचावलेल्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Bhandara Hospital Fire Case: आगीतून बचावलेल्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

प्रातिनिधीक फोटो

९ जानेवारी रोजी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीतून बचावलेल्या एका बाळाचा शुक्रवारी दुर्दैवी मृत्यू झाला. या बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे या बाळाचे प्राण गेले असल्याचे सांगितले जात आहे. या लागलेल्या आगीत भंडारा तालुक्यातील कोका येथील सानू मनोज मारबते यांचे बाळ अवघ्या तीन महिन्यांचे होते. गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटमध्ये या चिमुकल्यावर उपचार सुरू होते.

दरम्यान, ९ जानेवारी रोजी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात मध्यरात्री लागलेल्या आगीत १० बाळांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर सात बाळांना सुखरूप बाहेर काढून त्यांना वाचविण्यात आले. त्यातील हा एक होता. याच्यासह बचावलेल्या सहा बालकांना प्रकृतीत सुधारणा झाल्याने घरी पाठविण्यात आले. परंतु, मारबते दाम्पत्याच्या या बाळाची प्रकृती गंभीर नाजूक असल्याने त्याच्यावर भंडारा येथील आयुष शिशू केअरमध्ये उपचार सुरू होते. मात्र १६ जानेवारी रोजी त्या बाळाची प्रकृती खालवल्याने नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. त्यानंतर अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचारादरम्यान त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र त्याला त्या घटनेपासून श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. त्यामुळे त्या बाळाला त्याच्या पालकांनी वैद्यकीय उपचारांसाठी नेले होते. मात्र या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अशी घडली घटना

९ जानेवारी रोजी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावेळी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. या युनिटमध्ये एकूण सतरा बाळं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, या SNIC मध्ये आऊटबॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेल्या सात बालकांना वाचवण्यात यश आले होते तर आऊट बॉर्न युनिटमधील दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मृत्युमुखी पडलेली बालकं एक ते तीन महिने या वयोगटातील होती.

First Published on: February 8, 2021 2:41 PM
Exit mobile version