शेतकरी कायद्यांविरोधात आज भारत बंद

शेतकरी कायद्यांविरोधात आज भारत बंद

केंद्र सरकारने नुकत्याच पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशातील राजकीय पक्षांनी सोमवारी भारत बंदची हाक दिली आहे. तसेच पेट्रोल, डिझेलची दरवाढ, कामगार विरोधी कायद्यांना विरोध करण्यासाठी देशातील ५०० पेक्षा अधिक शेतकरी संघटना व २० पेक्षा अधिक राजकीय पक्ष या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येते.

मुंबई येथे ३०० पेक्षा अधिक जनसंघटना सहभागी असलेली जनआंदोलन संघर्ष समिती महाराष्ट्र बैठक झाली. महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे. नाशिक जिल्ह्यात बंद यशस्वी करण्यासाठी २६ सप्टेंबर २०२१ रोजी काँग्रेस भवन, महात्मा गांधी रोड येथून सकाळी ११ वाजता व्यापार्‍यांना आवाहन करण्यासाठी फेरी काढण्यात आली. त्यात बंदला पाठिंबा देणार्‍या व सहभागी पक्ष संघटना, शेतकरी संघटना नेते सहभागी होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर, ज्येष्ठ नगरसेवक शाहू खैरे, गुलाम शेख, भाकपचे राजू देसले, महादेव खुडे, माकपचे सुनील मालुसरे, मुकूंद रानडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, अजिंक्य गीते, जय कोतवाल, शेतकरी संघर्ष संघटनेचे हंसराज वडघुले, नाना बच्छाव, राजेंद्र बागूल, वत्सला खैरे, शेकापचे अ‍ॅड. मनीष बस्ते, बहुजन शेतकरी संघटनेचे रमेश औटे, अशोक खालकर, तानाजी जायभावे, महादेव खुडे, प्रभाकर वायचले, विनायक येवले, योगेश कापसे, जाधव पाटील, विलास कांबळे, नीलेश सोनवणे, नाना बच्छाव आदी सहभागी झाले होते.

First Published on: September 27, 2021 5:38 AM
Exit mobile version