कोवॅक्सीनच्या पुरवठ्यावरुन राज्यांनी केलेल्या तक्रारी वेदनादायी, भारत बायोटेकडून नाराजी व्यक्त

कोवॅक्सीनच्या पुरवठ्यावरुन राज्यांनी केलेल्या तक्रारी वेदनादायी, भारत बायोटेकडून नाराजी व्यक्त

Covaxin: २-१८ वयोगटातील लहान मुलांसाठी कोव्हॅक्सिन सर्वात सुरक्षित, भारत बायोटेकचा दावा

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. सीरम इन्स्टिट्यूटमधून कोव्हिशिल्डचा पुरवठा करण्यात येत आहे. तर भारत बायोटेककडून कोवॅक्सिनचे उत्पादन करण्यात येत आहे. कोव्हिशिल्ड मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. तर कोवॅक्सिनचा कमी पुरवठा होत असल्यामुळे काही राज्यांनी तक्रारी आणि टीका केल्या होत्या. केंद्र सरकारच्या सूचनांमुळे कोवॅक्सिनचा पुरवठा मी केला जात असल्याचा आरोप दिल्ली सरकारकने केला होता. यावर भारत बायोटेकच्या संचालिका सुचित्रा इल्ला यांनी आमच्यावर होत असलेल्या तक्रारी वेदनादायी असल्याचे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.

दिल्ली सरकारने केलेल्या तक्रारीनंतर भारत बायोटेकच्या संचालिका सुचित्रा इल्ला यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. इल्ला यांनी ट्विट केले आहे की, जवळपास १८ राज्यांना १० मे २०२१ रोजी कोवॅक्सिनचे डोस पाठवण्यात आले आहेत. परंतु काही राज्यांनी आमच्या हेतुवर शंका घेतली असून ती आमच्यासाठी वेदनादायी आहे. आमच्या ५० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते सुट्टीवर आहेत. परंतु तरीही आम्ही या संकटामध्ये २४ तास काम करत आहोत असे ट्विट सुचित्रा इल्ला यांनी केले आहे.

काय केला होता आरोप

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, भारत बायोटेककडून लसींचे डोस पुरवण्यास असमर्थ असल्याचे कळवले आहे. कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्डचे प्रत्येकी ६७ लाख असे एकूण १ कोटी ३४ लसींचे डोस पुरवण्याची मागणी दिल्ली सरकारने केली होती. परंतु भारत बायोटेककडून लसींचे डोस पुरवण्यास असमर्थ असल्याचे कळविण्यात आले. यामुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लसींचा पुरवठा होत असल्याचा आरोप सिसोदिया यांनी केला होता. यावर भारत बायोटेकने नाराजी व्यक्त केली आहे.

First Published on: May 12, 2021 5:22 PM
Exit mobile version