हे लोक आपल्या देशाचे तर राष्ट्रभक्त असू शकत नाहीत, राहुल गांधीचा भाजपावर निशाणा

हे लोक आपल्या देशाचे तर राष्ट्रभक्त असू शकत नाहीत, राहुल गांधीचा भाजपावर निशाणा

कॉग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात भारत जोडो यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार, टप्प्यात ही कॉंग्रेसचे भारत जोडो यात्र प्रत्येक राज्यात प्रवेश करत आहे. सध्याही भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून जात आहे. या यात्रेवेळी उपस्थितांना संबोधताना भाजपावर निशाणा साधला. ‘आपल्याच देशातील जाती- धर्मांच्या लोकांमध्ये भांडणे लावणारे भाजपावाले कोणत्या देशाचे राष्ट्रभक्त? असा सवाल विचारात हे लोक आपल्या देशाचे तर राष्ट्रभक्त असू शकत नाहीत’, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला. (Bharat Jodo Yatra Congress BJP Conflict Between Castes And Religions Say Rahul Gandhi)

“देशात द्वेष पसरवण्याचे काम भाजपा, आरएसएस कडून केले जात आहे. जाती-धर्मांमध्ये भांडणे लावली जात आहेत. आपल्याच देशातील जाती- धर्मांच्या लोकांमध्ये भांडणे लावणारे भाजपावाले कोणत्या देशाचे राष्ट्रभक्त? असा सवाल विचारात हे लोक आपल्या देशाचे तर राष्ट्रभक्त असू शकत नाहीत”, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

“भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील दुसऱ्या दिवशीच्या पदयात्रेची सांगता भोपाळा गाव येथील छोटेखानी सभेने झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्याच दिवशी 6 वर्षांपूर्वी रात्री 8 वाजता टीव्ही वर येऊन 1000 व 500 रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्या होत्या. त्यानंतर जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू करून देशातील लहान, मध्यम उद्योगांवर मोठा आघात केला होता. नरेंद्र मोदी यांच्या या दोन्ही निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था बर्बाद झाली”, असा घणाघाती हल्ला राहुल गांधी यांनी केला.

“देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले छोटे, मध्यम, लघु उद्योगांचे मोठे नुकसान झाले, लाखोंच्या संख्येने उद्योग बंद पडले, लाखो रोजगार गेले. तर नोटबंदीच्या लहरी निर्णयानेही जनतेचे नुकसान झाले. दोन्ही निर्णयाने देशाचे मोठे नुकसान झाले तर केवळ दोन-तीन उद्योगपतींचा फायदा झाला. शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही पण मोठ्या उद्योगपतींचे लाखो कोटी रुपयांचे कर्ज मात्र माफ होते. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग भांडवलदारांना विकले जात आहेत परिणामी तरुणांना नोकरी मिळणे दुरापास्त झाले आहे”, असेही राहुल गांधी यांनी म्हटले.


हेही वाचा – खोके म्हटल्यावर झोंबतं का? ते पहिल्यांदा सांगा मग नोटीस; आदित्य ठाकरेंचे शिंदे गटाला प्रत्युत्तर

First Published on: November 9, 2022 12:08 PM
Exit mobile version