काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला 7 सप्टेंबरपासून सुरुवात

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला 7 सप्टेंबरपासून सुरुवात

देशभरात मागील अनेक काळापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कॉग्रेसने देशभरात आंदोलन केले होते. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर आता काँग्रेसच्या वतीने ‘भारत जोडो यात्रा’ काढण्यात येणार आहे. सोमवारी रात्री देखील काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासोबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली आहे. या बैठकीत भारत जोडो यात्रेसंदर्भात विविध मुद्यांवर चर्चा झाली. येत्या 7 सप्टेंबरपासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु होणार आहे. ही यात्रा 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधून जाणार आहे. (bharat jodo yatra of congress will start from September 7)

यासंदर्भात मंगळवारी दुपारी 12 वाजता काँग्रेसची नवी दिल्लीत पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये भारत जोडे यात्रेच्या संदर्भात पुढची दिशा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही पत्रकार परिषद काँग्रेसचे वरिष्ठ नेते घेणार आहेत. काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत काढण्यात येणार आहे. ही पदयात्रा 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधून जाणार आहे.

भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियामध्ये देशभरातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. यावेळी ‘स्वराज इंडिया’चे योगेंद्र यादव आणि इतर अनेक सामाजिक आणि गैर-सरकारी संस्थांचे सदस्य देखील या बैठकीला उपस्थित होते.

भारत जोडो यात्रा


हेही वाचा – गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू, सरकारने त्वरित मदत करावी; अजित पवारांची सरकारकडे मागणी

First Published on: August 23, 2022 9:58 AM
Exit mobile version