ते ५० होते अन् मी एकटाच होतो, काय घडलं नेमकं अध्यक्षांच्या चेंबरमध्ये

ते ५० होते अन् मी एकटाच होतो, काय घडलं नेमकं अध्यक्षांच्या चेंबरमध्ये

ते ५० होते अन् मी एकटाच होतो, काय घडलं नेमकं अध्यक्षांच्या चेंबरमध्ये ते ५० होते अन् मी एकटाच होतो, काय घडलं नेमकं अध्यक्षांच्या चेंबरमध्ये

भास्करराव जाधव यांनी म्हटलं आहे की, ज्यावेळी तालिकेवर आलो त्यावेळेला उपाध्यक्ष महोदय बसले होते. उपाध्यक्ष बसले असताना पलिकडचे सदस्य घोषणा देत होते. त्यावेळी तालिकेवर येऊन बसलो. त्यावेळी बिल सादर करण्याचा कार्यक्रम होता ति बंल सादर करुन घेतली आणि त्याचवेळी काही सभागृहात नॉर्मल असं वातावरण झालं. त्यावेळी सभागृहाचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यामध्ये ओबीसी आरक्षणाचा विषय चर्चेमध्ये आहे. त्या विषयाबाबत सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांना त्याची अस्था आहे. त्या ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकावं आणि मिळावं यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहे. परंतु अशा प्रकारचे निर्णय ज्यावेळेला घ्यायचा असतो. तेव्हा विधीमंडळामध्ये अशा प्रकारचा ठराव हा सर्व संमतीने संमत करावा अशा प्रकारची एक प्रथा असते.

भुजबळांनी पहिला प्रस्ताव मांडला पाहिजे त्यांनी प्रस्ताव मांडल्यानंतर विरोधी पक्षाच्या वतीनं आपण काही विरोधी पक्षनेत्यांना बोलायला देणं हा वैधानिक अधिकार आहे. परंतु विरोधी पक्षनेत्यांनी प्रस्ताव मांडण्यापुर्वीच माझा हरकतीचा मुद्दा आहे. अशा प्रकारची विरोधी पक्षनेत्यांनी हरकत घेतली. खर तर प्रस्ताव मांडला नव्हता ज्याअर्थी प्रस्ताव नाही, कामकाज नाही तर तुम्ही हरकत कशावर घेता हे म्हणू शकलो असतो परंतु म्हणालो नाही. त्यांना बोलू दिले. त्यावेळी विरोधी बाजूचे सदस्य चेंबरमध्ये उभे होते. त्यावेळी विरोधी पक्षनेत्यांना विनंती केली की, आपण बोलताय तर तुमच्या सदस्यांना आपण बसायला सांगा. विरोधी पक्षनेते हळू आवाजात बोलले परंतु त्यांचा माईक चालु होता हळू आवाजात बोलले नाही नाही बसायचे नाही. दादा सांगत होते बसा मांझं पुर्ण लक्ष होते.

ठिक आहे, उभे राहिला त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी आपले संपुर्ण मुद्दे विस्ताराने, कायदेशिर मांडले त्यावेळी सभागृहात शांतता होती. त्याचवेळी विरोधी पक्षनेत्यांना सांगितले किती बोलायचे तेवढा वेळ बोले परंतु जेव्हा सरकारच्यावतीने मंत्री महोदय उत्तर देतील बाजू मांडतील तेव्हा आपणसुद्धा शांतता राखण्याचे वचन आणि शब्द द्या. त्यावेळी विरोधी पक्षनेते यांनी म्हटलं की ते जर मेरिटवर बोलणार असतील तर आम्ही ते ऐकू त्यावर म्हटलं की, मेरिट डिमेरिट ठरवायचे कोणी आपण ठरवायचं असं मी म्हटलं. त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांचे भाषण पुर्ण झालं त्यावर कोणीही अडथळा आणला नाही.

मंत्री भुजबळ यांनी विरोधी पक्षनेत्यांनी जे जे प्रश्न केले त्यावर उत्तर द्यायला सुरुवात केली. मंत्री महोदयांना स्वतः सांगितले की, सभागृहाच्या कामकाजाच्या प्रमाणे पहिला प्रस्ताव वाचा, प्रस्ताव वाचा आणि त्यावर भाष्य करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खुणावले आणि प्रस्ताव वाचण्याचे विनंती केली.

महाराष्ट्राच्या इतिहासात असं घडलेलं माझ्यासारख्या माणसाने कधीही पाहिले नाही. मी आक्रम आहे. रोखठोक आहे. आयुष्यात दोन गोष्टीमुळे नुकसान देखील झाले आहे एकतर मला खोटं बोललेलं आवडत नाही आणि दिलेली वेळ टाळायला कधीही मागेपुढे करत नाही. अनेकवेळा झाले आहे की, सत्ताधाऱ्यांनी दिलेलं उत्तर विरोधकांना आवडत नाही मग विरोधक बहिष्कार घालतात. परंतु त्याविरोधात काही भूमिका नाही घ्यायची. प्रस्ताव मंजूर करत असताना काही सदस्य व्यासपिठावर आले. या सदस्यांनी माझ्यासमोरचा माईक ओढायचा प्रयत्न केला. राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. जे काही आक्रमक व्हायचे झाले. थोडं फार कामकाज मला कळतं त्यामुळे थेट त्यांना सांगितले की, मी तुम्हाला नेम करतो. नेम करणं म्हणजे काय हे माजी अध्यक्ष वळसे पाटील यांना माहिती आहे.

यापुर्वीही अशा प्रकारचा हंगामा सभागृहात झाले आहेत यानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करुन अध्यक्षाच्या चेंबरमध्ये विरोधक आणि सत्ताधारी बसून तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात. सभागृह सुरु असताना सभागृहामध्ये ताण तणावाचे प्रश्न निर्माण होतात. सदस्य एकमेकांच्या आंगावर धावून जातात. वरिष्ठ सदस्य त्यांना अडवतात परंतु एकदा का अध्यक्षांनी कामकाज तहकूब केलं का तो विषय तिथेच थांबतो. मी अनेकवेळा या सभागृहात भाष्य केलं आहे. अयुध वापरलं आहे. परंतु सभागृहाच्या बाहेर गेल्यानंतर व्यक्तीगत कधीच कटुता ठेवली नाही. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपले संस्कार आहेत. विधानमंडाळत बसलो आहेत लोकशाहीच्या मंदिरात बसलो आहे. संस्कृतीच्या गोष्टी करतो. सभ्यतेचा आव आणतो

आज सभागृहातून बाहेर गेलो आणि बाहेर गेल्यानंतर उपाध्यक्षांनी खुर्ची ओढली आणि म्हणाले इथे बसा त्यांना म्हटलं की, मी बसू शकत नाही ही खुर्ची मी काय कायमचा या ठिकाणी कामकाज चालवण्यासाठी इथे बसलो आहे. मी समोर बसले त्यानंतर देवेंद्र फडणवीस रागाने लालबुंद होऊन आले. ते आल्यानंतर मी खुर्चीवरुन उठलो आणि त्यांना बसायला सांगितले. चंद्रकांत दादा आले त्यांना बाजूच्या खुर्चीवर बसायला सांगितलं, त्यांना सांगितले असं कितीवेळा सभागृहात घडले आहे. परंतु त्यावेळी विरोधी पक्षनेते फडणवीस आणि चंद्रकांत दादा ऐकण्याच्या मनस्थिती नव्हते. त्याचवेळी विरोधी पक्षाती अनेक सदस्य आतमध्ये आले आणि माझ्या आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या आहेत. घुसले ते घुसले काही सदस्यांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला काही राडेबाज असतात, काही गावगुंड असतात अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी माझ्यावर तुटून पडत होते. त्यांच्या वरिष्ठांना सांगितले की, यांना आवरा तेव्हा विरोधी पक्षनेते म्हणाले की, आम्ही आवरत नाही आम्हाला राग आला आहे. तेव्हा म्हणालो की, भास्कर जाधवला राग काय कमी आहे का?

त्यांना हे ही सांगितले तुम्ही ५०-६० जण असले तरी एकटा आहे. एक पाऊलही मागे हटणार त्यांच्यातलेच काही जण म्हणाले भास्करराव इथून चला सगळे चिडले आहेत. परंतु मी मागे हटलो नाही. संपुर्ण महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना आहे. दुसरी गोष्ट काही लोकांनी सांगितले आहे की, भास्कर जाधव यांनी भाजपला शिवीगाळ केली. संसदीय कार्यमंत्री, सरकारला आदेश वजा सुचना आहे. या संदर्भात मगाशी सांगितल्याप्रमाणे म्हातारे गेल्याचं दुःख नाही परंतु काळ सोकवता कामा नये. याचा निर्णय योग्य व्हायला हवा उपाध्यक्षांच्या चेंबरमध्ये सांगितले. इथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत की नाही माहित नाही परंतु सरकार आणि माझ्या नेत्यांनी सहकार्य केलं तर अध्यक्षाचे काय अधिकार असतील तर ते मी दाखवल्याशिवाय राहणार नाही. असं म्हटलं आहे तसेच मी जर शिवीगाळ केली असेल तर जी शिक्षा द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे.

मी अजिबात चूक केली नाही, मी आक्रमक परंतु सभागृहात कधीही चुकीचे वक्तव्य केलं नाही. झाल्याप्रकाराबद्दल आशिष शेलार यांनी माफी मागितली. त्यांना फक्त दोन -तीन वेळा माझी माफी मागितली, त्यांनी माफि मागाची म्हणजे आधी लाथ लावायची आणि मग सॉरी म्हणायचं असा प्रकार असल्याचे तालिका सदस्य भास्कर जाधव यांनी म्हटंल आहे.

First Published on: July 5, 2021 4:21 PM
Exit mobile version