नियमात नसताना सेलिब्रिटींना लस कशी मिळते?, भातखळकर यांची चौकशीची मागणी

नियमात नसताना सेलिब्रिटींना लस कशी मिळते?, भातखळकर यांची चौकशीची मागणी

नियमात नसताना सेलिब्रिटींना लस कशी मिळते?, भातखळकर यांची चौकशीची मागणी

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि मास्क हा पर्याय नाही आहे. कोरोना रोखण्यासाठी लसीकरणच एकमेव पर्याय असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे राज्यातही कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. परंतु कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे कोरोना लसीकरणात अडथळा येत आहे. असा परिस्थितही फ्रंटलाईन वर्कर्स नियमात आहेत अशांना लस मिळत नाही परंतु सेलिब्रेटींना लसींचे डोस मिळत आहेत. यामुळे या सेलिब्रेटिंना लसींचे डोस कसे मिळत आहेत. नियमात नसतानाही कसे लसीकरण केले जात आहेत याची चौकशी झाली पाहिजे आशी मागणी भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत परदेशी जाणारे विद्यार्थी,फ्रंटलाईन वर्करना लस मिळत नाही परंतु अभिनेते आणि अभिनेत्र्यांना कशाचा आधारावर लस मिळत आहे. असा सवास उपस्थित केला आहे. तसेच याच्यामागे सत्तेतील कोणाचा हात आहे हे जनतेला समजले पाहिजे यासाठी चौकशी करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. “देशात १८ ते ४४ वयोगटासाठी लस मिळत नव्हती तेव्हापासून मुंबईत बॉलिवूडच्या सेलिब्रेटींना ही सुविधा उपलब्ध आहे. परदेशी जाणारे विद्यार्थी,फ्रंटलाईन वर्करना लस मिळत नाही, पण सत्तेच्या वळचणीला असलेल्या प्रत्येकाला मिळतेय. सुझान खान वय वर्ष ४२, कोविशील्डचे दोन्ही डोस घेतले” असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.

दरम्यान अतुल भातखळकर यांनी म्हटले हे की, सुप्रसिद्ध इंटिरियर डिजायनर सुझान खान यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर असे लिहिले आहे की, २ दिवसांपुर्वी त्यांनी कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेतला आहे. इकडे फ्रंटलाईन वर्कर्सना नियमात असताना कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन मिळत नाही आहे. परदेशी विद्यार्थ्यांना वणवण भटकावे लागत आहे परंतु सुझान खान आणि त्यांच्या कंपनीतील ५० कर्मचाऱ्यांना मात्र नियमाच्या बाहेर जाऊन कोरोना लसीचा डोस मिळतो कसा काय? याची चौकशी करायची आवश्यकता आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लसीचा डोस मिळत नाही आहे. ज्यांना आवश्यक आहे त्यांना कोरोना लस नाही. पण जे नियमात बसत नाही त्या लोकांना आणि त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांना कोरोना लसींचा डोस मिळत आहेत. या संपुर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. यांच्या मागे कोणाचा राजकीय वरदहस्त आहे? कोण मंत्री आहे? याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळक यांनी केली आहे.

First Published on: June 3, 2021 5:09 PM
Exit mobile version