माझ्यासमोर येऊन बसून बोलावं, किरीट सोमैय्यांना भावना गवळींचे आव्हान

माझ्यासमोर येऊन बसून बोलावं, किरीट सोमैय्यांना भावना गवळींचे आव्हान

भावना गवळी स्वतःच्या १०० कोटींच्या घोटाळ्याची शिक्षा आईला देऊ नका, किरीट सोमय्यांचे वक्तव्य

शिवसेना खासदार भावना गवळी यांनी १०० कोटी घोटाळा विरोधात न्यायालयात जनहित याचिका भाजप माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी केली आहे. किरीट सोमैय्या यांनी केलेल्या १०० कोटी घोटाळ्याच्या आरोपावर शिवसेना खासदार भावना गवळी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. किरीट सोमैय्यांनी माझ्यासमोर येऊन बसून बोलावं त्यावेळी त्यांना उत्तर देईल. असे भावना गवळी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामुळे वाशिम शिवसेनेचा हायवे घोटाळा उघडकीस आला असल्याचा आरोप किरीट सोमैय्या यांनी केला आहे. भावना गवळी यांच्या कार्यालयातून पहाटे ५ वाजता ७ कोटी रोख नगदी चोरी झाली असल्याची तक्रारही किरीट सोमैय्या यांनी केली आहे.

भाजप माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी शिवसेने वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. यावर भावना गवळी यांनी म्हटलं आहे की, किरीट सोमैय्या यांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. एकेकाळी ते ही आमचे सहकारी होते. मात्र त्यांनी माझ्यासमोर येऊन बसावे आणि सांगावे की, कोणता भ्रष्टाचार झाला आहे तसेच कशामध्ये झाला आहे. मी त्याच्यावर उत्तर देईन असे प्रत्युत्तर शिवसेना खासदार भावना गवळी यांनी दिलं आहे.

किरीट सोमैय्यांचा आरोप

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामात वाशिम मतदारसंघातील शिवसेना लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप होत असल्याची तक्रार केली होती. यावरुन किरीट सोमैय्या यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. नितीन गडकरी यांच्या पत्रामुळे वाशिम शिवसेनेचा हायवे कॉन्ट्रॅक्ट घोटाळा झाला उघडकीस आला आहे. वाशिम शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या १०० कोटींच्या घोटळ्या विरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शुक्रवारी वाशिम येथे भेट देणार असल्याचे किरीट सोमैय्या यांनी म्हटलं आहे.

खासदार भावना गवळी यांचा कार्यालयातून पहाटे ५ वाजता ७ कोटी रोख नगदी चोरी झाली. शिवसेना भावना गवळी त्यांचा कार्यालयातून, त्यांचा उपस्थितीत ७/७/२०१९ रोजी सकाळी ५ वाजता ७ कोटी नगदी रोख, ११ लोकांनी चोरले, अशी तक्रार १२/५/२०२० रोजी वाशीम पोलीस ठाण्यात केली असल्याचे किरीट सोमैय्या यांनी सांगितले आहे. तेच एवढी रोख रक्कम आली कुठून? असा सवालही किरीट सोमैय्या यांनी उपस्थित केला आहे.

नितीन गडकरी यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळे आणणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांची कामे करीत असलेल्या ठेकेदारांना शिवसेनेचे काही पदाधिकारी धमकावत असून काम बंद करण्यास सांगत आहेत. काम थांबवण्यापर्यंत लोकप्रतिनिधींची मजल गेली आहे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचे आणि जनतेचे नुकसान होईल. आपण लोकांच्या दृष्टीने अपराधी ठरु असे नितीन गडकरी यांनी पत्रात म्हटलं आहे. तसेच असाच प्रकार सुरु राहिल्यास आमच्या मंत्रालयाला पुन्हा रस्ते निर्मिती करण्यास विचार करावा लागेल असा इशाराही नितीन गडकरी यांनी दिला आहे.

First Published on: August 16, 2021 5:31 PM
Exit mobile version