Bhima koregaon case : कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने परमबीर सिंह, रश्मी शुक्ला यांना बजावला समन्स

Bhima koregaon case : कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने परमबीर सिंह, रश्मी शुक्ला यांना बजावला समन्स

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्यात आले आहेत. भीमा कोरेगावमध्ये १ जानेवारी २०१८ मध्ये हिंसा घडली होती. या प्रकरणाची चौकशी आयोगामार्फत करण्यात येत आहे. यामध्येच चौकशी करण्यासाठी आयोगाकडून रश्मी शुक्ला आणि परमबीर सिंह यांना समन्स बजावण्यात आले आहेत. रश्मी शुक्ला या पुणे पोलीस आयुक्त असताना ही हिंसा घडली होती. यावेळी परमबीर सिंह कायदा सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते यामुळे दोन्ही अधिकाऱ्यांना आयोगाने पुढील चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

कोरेगाव भीमा युद्धाच्या २०० वा स्मृतिदीन साजरा करण्यात आला. यावेळी लाखो लोकांची गर्दी झाली होती. याचा फायदा गर्दीतील काही माथेफिरु आणि समाजकंटकांनी घेत हिंसाचार केला. हा हिंसाचार उफाळला यामुळे त्याचे दंगलीत रुपांतर झाले. या दंगलीची चौकशी कोरेगाव भीमा चौकशी आयोगामार्फत होत आहे. यावेळी रश्मी शुक्ला पुणे पोलीस आयुक्त आणि परमबीर सिंह कायदा सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते त्यामुळे त्यांच्याकडील माहिती घेण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहेत.

भीमा कोरेगाव दंगलीची माहिती रश्मी शुक्ला आणि परमबीर सिंह यांच्याकडे आहे. त्यांच्याकडील इनपुट घेण्यासाठी आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी अर्ज केला होता. आयोग अध्यक्ष माजी न्यायमूर्ती जे एन पटेल यांनी सातपुते यांचा परमबीर आणि रश्मी शुक्लांकडून माहिती घेण्यासाठीचा अर्ज मंजूर केला आहे. यामुळे आता या दोन्ही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत.


हेही वाचा : सरकार पडत नसल्यामुळे वेगवेगळ्या यंत्रणांद्वारे कारवाई, जयंत पाटील यांचा केंद्रावर निशाणा


 

First Published on: October 22, 2021 9:00 PM
Exit mobile version